दर्यापूर-इटकी मार्गावरील अपघातप्रवण पुलाची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:26 IST2018-06-25T23:26:00+5:302018-06-25T23:26:19+5:30
इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हाधिकाºयांकडे अवहाल सादर केला. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.

दर्यापूर-इटकी मार्गावरील अपघातप्रवण पुलाची उंची वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हाधिकाºयांकडे अवहाल सादर केला. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.
सदर पुलाची उंची वाढवून त्वरित दुरुस्ती करण्यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गांवडे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, दर्यापूर विधानसभा संपर्कप्रमुख प्रदीप चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली. परंतु प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे यांनी सद्यस्थितीत उंची वाढविणे किंवा पूलबांधणीस जिल्हा परिषद निधी उपलब्ध नसल्यामुळे काम करणे शक्य नाही, असे उत्तर देऊन दिले. कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना येथून जाताना त्रास सहन करावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.