शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेत वाढ, आरटीई प्रवेशासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:39 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे.

जितेंद्र दखनेअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे. या जागांवर प्रवेश मिळविणा-या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते.त्यानुसार शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये होणा-या २५ टक्के प्रवेशाकरिता प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये कमाल अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर अनुदान शैक्षणिक सत्र २०१६-२०१७ साठी निर्धारित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक खासगी विनाअनुदानित शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित कुटुंबातील बालकांकरिता २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्या जागांवर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे, अशा बालकांच्या पालकांकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येत नाही. परंतु शाळांना येणा-या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे प्रति विद्यार्थी शाळांना येणारा खर्च राज्य शासनाकडून देण्यात येतो. शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा शाळांना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.परंतु अनेक शाळांनी सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. खासगी शाळांमधील शिक्षकांचे वेतन आणि तेथील शैक्षणिक सुविधा लक्षात घेता शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के प्रवेशांच्या अनुदानात प्रतिपूर्ती वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक सत्र २०१६ आणि २०१७ करिता प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत, त्या शाळेने विद्यार्थ्यांना आकारलेल्या निव्वळ शैक्षणिक शुल्क अथवा शासनाने निर्धारित केलेल्या रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम प्रतिपूर्तीसाठी सादर करावी, असेही शासन आदेशात नमूद आहे.शासनाने प्रतिपूर्ती शुल्कात नुकतीच वाढ केली आहे. त्यानुसार प्राप्त सूचनेप्रमाणे याचा लाभ संबंधित शाळांना दिला जाईल.- आर. डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती