संक्रमणमुक्तांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:13+5:30

जिल्ह्यात सद्यस्थितीत जेवढ्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने व्यक्ती उपचाराअंती बरे होत आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८१ दिवसांत ४४६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. मात्र, आरोग्य यंत्रणाद्वारे घेण्यात येणारी काळजी व रुग्णाचे मनोबल यामुळे उपचाराअंती बरे होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.

The incidence of infection is higher than that of coronaviruses | संक्रमणमुक्तांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांपेक्षा अधिक

संक्रमणमुक्तांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांपेक्षा अधिक

ठळक मुद्देसुखद : सद्यस्थितीत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १२५, ३१२ व्यक्तींना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाविषयी भीती व्याप्त असताना, प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२५ संक्रमित उपचारासाठी दाखल आहेत, तर ३१२ व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत जेवढ्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने व्यक्ती उपचाराअंती बरे होत आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८१ दिवसांत ४४६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. मात्र, आरोग्य यंत्रणाद्वारे घेण्यात येणारी काळजी व रुग्णाचे मनोबल यामुळे उपचाराअंती बरे होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. यापूर्वी रुग्ण दाखल केल्यानंतरच्या १६ व्या दिवशी कोणतेही लक्षण नसल्यास त्यांचा सलग दोन दिवस थ्रोट स्वॅब घेतला जायचा व चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात येत होती.
आरोग्य विभागाच्या नव्या गाईड लाईननुसार आता रुग्ण दाखल झाल्यानंतरच्या पाच दिवसांत त्यांना औषधांचा कोर्स दिला जातो व त्यानंतर त्यांना कोणतेही लक्षणे नसल्यास येथीलच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) दाखल करण्यात येते. यानंतरच्या पाच दिवसांत त्या व्यक्तीमध्ये कोणतेही लक्षणे नसल्यास, त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येते. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व सर्व कर्मचारी त्यांचे टाळ्या वाजवून, मिठाई देऊन स्वागत करतात. त्यांना पुढील सात दिवस हमीपत्रावर घरी विलगीकरणात ठेवण्यात येते. त्यांना वेळोवेळी माहिती देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पॉझिटिव्ह प्रसूत कोरोनामुक्त बाळही निगेटिव्ह
सिद्धार्थनगरातील २० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती १४ जूनला कोविड रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेच्या प्रसूतीसाठी या ठिकाणी स्वतंत्र आॅपरेशन थिएटर तयार करण्यात आले. तिची सुखरूप प्रसूती झाली. बाळाचा अहवालही निगेटिव्ह आला. २२ जूनला ही महिला संक्रमणमुक्त झाल्याचा अहवाल मिळाला. बाळ व त्याची माता दोघेही निगेटिव्ह झाल्याची जिल्ह्यासाठी सुखद वार्ता आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह ४४६ रुग्णसंख्येच्या तुलनेत ३१२ संक्रमणमुक्त झाले आहेत. हे प्रमाण ७०.४२ टक्के आहे. इतर रुग्णही उपचाराअंती लवकरच घरी जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात येथील कोविड रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी गत साडेतीन महिन्यांपासून अविरत सेवा देत आहेत.

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. नागरिकांचेही सहकार्य आहे. नागरिकांनी घाबरू नये. आपली काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास स्वॅब देण्यासाठी पुढे यावे.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी

Web Title: The incidence of infection is higher than that of coronaviruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.