कावली येथे ग्रामसंघ फलकाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:10+5:302021-09-22T04:14:10+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य जयश्री ढोले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंदा जांभळे, ग्रामसचिव पोलादे आदी मान्यवर उपस्थित ...

कावली येथे ग्रामसंघ फलकाचे उद्घाटन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य जयश्री ढोले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंदा जांभळे, ग्रामसचिव पोलादे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर सखी ग्रामसंघ या फलकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये उमेद अंतर्गत महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे महिलांच्या रोजगाराला बळकटी मिळाली आहे. अधिक महिलांनी याअंतर्गत आपला स्वतःचा रोजगार उपलब्ध केल्याने संसाराचा गाडा सुरळीत चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामसंघांतर्गत महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे वर्धिनी सुकेशनी टाले यांनी सांगितले. यावेळी ग्राम संघाच्या अध्यक्ष सीमा राणे, सचिव लता टाले, कोषाध्यक्ष अरुणा माकोडे, ज्योती भातपीरे, प्रतिभा टाले, सुकेशनी टाले व गावातील महिला यावेळी उपस्थित होत्या.
200921\1423img-20210920-wa0160.jpg
फोटो