शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राठीनगर ऐवजी संभाजीनगर नाव देऊन बसथांब्याचे उद्घाटन

By admin | Updated: May 21, 2016 00:18 IST

स्थानिक महापालिकेच्या राठी नगरस्थित बसस्थानकाचे नाव संभाजीनगर करून युवा सेनेने बुधवारी सायंकाळी

युवा सेनेचा पुढाकार : महाापालिकेच्या थांब्याचे नामकरण अमरावती : स्थानिक महापालिकेच्या राठी नगरस्थित बसस्थानकाचे नाव संभाजीनगर करून युवा सेनेने बुधवारी सायंकाळी नामाकरण करून या बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा साजरा केला आहे.शहराला अंबादेवी तसेच थोर महापुरुषाचा जुना इतिहास लाभला आहे. परंतु या थोर संतांचा अवमान करण्याचा डाव महापालिकेने रचल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून महापालिकेच्या माध्यमातून एका खासगी कंपनीसोबत करार करून महानगरात जाहिरात करणारे बसस्थानक उभारले आहेत. गाडगेबाबा नगर बाजूला महापालिकेच्या रेकॉर्डवर पोष्टाच्या नोंदणीवर तसेच शासन दरबारी असलेल्या कागदपत्रावर संभाजी नगर असे नाव दिले. यासंदर्भात युवा सेनेने महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिली होती. परंतु तरीसुद्धा बसस्थानकाला राठीनगर असे नाव महापालिकेने दिले. याचीच दखल घेत युवा सेनेने या बसस्थानकांचे नामातंरण केले आहे. युवा सेना शहरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात बसस्थानकावर संभाजीनगर या नावाचे फलक लावून नामातंरणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा टेंभरे, जिल्हाप्रमुख वर्षा भोयर, ललित झंझाड, बंडू देशमुख, गोपाल राणे, आशिष ठाकरे, विजय बेनोडकर, विजय ठाकरे, वैभव मोहोकार, श्याम मुळे, निखिल तिवारी, कौस्तुभ कोरडे, नितीन भोरे, कुणाल मंजलवार, गौरव गतफने, शुभम कुबडे, शुभम गाडवे, शुभम हिवसे, अनुराग बागडे, गौरव कांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शाखा संभाजी नगर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारचे बसस्थान संपूर्ण शहरात असून त्या बसस्थानकावर महापुरुषांचे नाव वगळून दुसरे नाव दिले गेले. ती सर्व नावे १५ दिवसांच्या आत बदलावे, अन्यथा शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. (प्रतिनिधी)