लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल सोमवारी दुपारी १:०० वाजता जाहीर झाला. त्यात अमरावती जिल्ह्याचा एकूण निकाल ९१०५ टक्के असून, मुर्लीनीच निकालात आघाडी घेतली आहे. वाणिज्य शाखेतून येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा यश खलोकार याने २७ टक्के, विज्ञानमधून ब्रिजलाल बियाणीचा आयुष जमनारे ९६.३३ टक्के, तर कला शाखेतून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची रिया धकाते हिने ९५.५० टक्के गुण मिळवत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकालात २ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यात बारावीचे परीक्षार्थी असलेले ४४७ कनिष्ठ महाविद्यालये आहे. १३६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातून ३४,४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १७,८३९ मुले, तर १६,५७९ मुर्तीचा समावेश होता. त्यापैकी ३१,३४० विद्यार्थी उत्तीर्ण विज्ञान झाले. यात १५,७१४ मुले, तर १५,६२६ वाणिज्य मुलींचा समावेश आहे. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेण्यात शहरातील मुलामुलींचा टक्का अधिक राहिला.
अनपेक्षित यश, 'हेल्थ फेल' मुव्हीने दिले बळ१२वी कॉलेजमध्ये सरांनी सर्व पातळीवर लक्ष दिले, टेस्ट घेतल्या, चुका दाखवून दुरुस्त केल्या. खासगी कोचिंग क्लासचाही मोठा फायदा झाला. . शिवाय स्टडी केल्याने यश मिळालं, पण हे अनपेक्षित आहे, 'हेल्थ फेल' मुव्ही पाहल्यानंतर अभ्यासाला खूप बळ मिळाल्याचे यश प्रभुदास खलोकार यांने प्रांजळपणे सांगितले. यश हा येथील श्रीमती केशरबाई लाहोटी ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. त्याला कुठल्याही ग्रेस गुणाशिवाय निर्भेळ ५८२ गुण मिळाले ही २७ टक्केवारी आहे. त्याला पुढे 'सीए' करायचे आहे. अभ्यासासोबत रोज रायटिंग प्रॅक्टीस केली. येथील सोनल कॉलनीत राहणाऱ्या यशचे वडील प्रभुदास खलौकार है एलआयसीमध्ये नोकरी करतात, तर आई अर्चना गृहिणी, भाऊ बँकेत सहायक व्यवस्थापक आहे. यांनी सतत मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केल्याचे यश म्हणाला. त्याला तर व्हिडीओ एडिटिंग करणे त्याचा आवडीचा छंद आहे. सिनेमा पाहतो; पण टीव्ही सिरियलमध्ये फारशी रुची नाही, मात्र यू-ट्युब पाहणे फार आवडते.
आयुषला इंजिनिअरिंग नंतर बनायचे आयपीएसशहरातील ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आयुष अमोल जामनारे हा ९६.३३ टक्के गुण मिळवत बारावीच्या निकालात विज्ञान शाखेत जिल्ह्यातून प्रथम ठरला. आयुषला इंजिनीअरिंग करायचे असून, त्यानंतर आयपीएस होण्यासाठी यूपीएससीची तयारी करणार असल्याचे त्याने 'लोकमत'ला सांगितले. साईनगर परिसरात राहणाऱ्या आयुषचे वडील अमोल जामनारे हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असून, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आई शुभांगी या दंतरोग चिकित्सक आहेत. आयुषने आधीपासूनच आयपीएसकडे वळण्याचा निश्चय केला आहे. परंतु, त्यापूर्वी इंजिनीअरिंग करायचे असल्याने त्याने नुकतीच जेईईची परीक्षा दिली. त्यामध्ये त्याला २८.६० पर्सेटाईल मिळाले. त्याने शिकवणी वर्ग व कॉलेजचा वेळ वगळता सहा तास अभ्यास केला, तर परीक्षेच्या काळात तब्बल १२ तास रोज अभ्यास केला.
रिया धकातेला जायचेय प्रशासकीय सेवेतशासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी रिया अजय थकाते हिला २५.५० टक्के गुण मिळाले व ती कला शाखेत जिल्ह्यात पहिली आली आहे. नियमित अभ्यास, रोज कॉलेजमध्ये शिकविलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे यामुळे यश मिळाले. पुढे सिव्हिल सव्हिसेसमध्ये जायचे असल्याचे रियाने सांगितले. महाविद्यालयातील सरांनी सराव पेपर घेतले, यामध्ये झालेल्या चुका निदर्शनात आणून दिल्या, शिवाय महाविद्यालयात रोज नियमित क्लास झाले. त्यामुळे रोजचा अभ्यास त्याच दिवसी पूर्ण करता आला तसेच गतवर्षीचे पेपर सोडविले. तिला बॅडमिंटन खेळायला आवडते, शिवाय फावला वेळ असला, तर सिनेमा, टीव्हीदेखील पाहत असल्याचे तिने सांगितले. तिने कला शाखेची नव्हे, तर पुढच्या अभ्यास सोईचा व्हावा, यासाठी अकाऊंटची शिकवणी लावली होती. रिथाचे वडील येथील पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. मोठा भाऊ अभियंता आहे.