व्यक्तिमत्त्व विकासासाठी कौशल्य आत्मसात करा

By Admin | Updated: July 18, 2015 00:19 IST2015-07-18T00:19:55+5:302015-07-18T00:19:55+5:30

युवाशक्तीमध्ये अनेक सुप्तगुण दडलेले आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी या सुप्त गुणांना चालना देण्याची गरज आहे.

Improve skills for the development of personality | व्यक्तिमत्त्व विकासासाठी कौशल्य आत्मसात करा

व्यक्तिमत्त्व विकासासाठी कौशल्य आत्मसात करा

राजाभाऊ गडलिंग : विद्यापीठात जागतिक युवा कौशल्य दिन
अमरावती : युवाशक्तीमध्ये अनेक सुप्तगुण दडलेले आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी या सुप्त गुणांना चालना देण्याची गरज आहे. यासाठी युवकांनी आत्मपरीक्षण व योग्य क्षेत्र निवडून त्यातच संधीचा शोध घेऊन कौशल्य हस्तगत करावे, असे आवाहन सम्यक कृषी औद्योगिक प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ गडलिंग यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या सभागृहात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक जयंत वडते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एस. आर. माणिक होते. विशेष अतिथी म्हणून फेडरेशन आॅफ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, बँकींग इन्स्टिटयुटचे संचालक रवी वाकोडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावतीचे विभागीय अध्यक्ष बी.आर. वाघमारे आदींची उपस्थिती होती. उद्योजक गडलिंग यांनी यावेळी स्वत:चे अनुभवन कथन केले.
उद्योजक किरण पातुरकर यांनीही मार्गदर्शन केले. बँकींग इन्स्टिटयुटचे संचालक रवी वाकोडे यांनी कौशल्य म्हणजे सर्वांगीण विकास, अशी कौशल्याची व्याख्या केली.
सहायक संचालक सुधाकर तलवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन के.सी. मोरे यांनी केले.

Web Title: Improve skills for the development of personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.