मोर्शी येथे कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:19+5:302021-09-22T04:14:19+5:30
मोर्शी : वारसा संस्थेच्यावतीने दोन वर्षांपासून सिंभोरा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या नरिमन पॉईंट येथे गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली ...

मोर्शी येथे कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन
मोर्शी : वारसा संस्थेच्यावतीने दोन वर्षांपासून सिंभोरा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या नरिमन पॉईंट येथे गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाते. यात शेकडो भाविकांनी लाडक्या गणरायाचे विसर्जन केले.
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता कृत्रिम तलावाची निर्मिती संस्थेमार्फत केली जाते. रविवारी व सोमवारीदेखील या तलावावर गणरायाच्या विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वारसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने भक्तिमय वातावरणात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. हार, फुले हे निर्माल्य वेगळे गोळा करण्यात आले. या उपक्रमाकरिता वारसा संस्थेचे अध्यक्ष अभिलाष व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात भाग्येश घुलक्षे, किरण निस्वादे, आदर्श खडसे, अनिकेत काळे, निखिल गोरे, पीयूष तायवाडे, शिवा किटुकले, तेजस बिशन यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.