शिस्त मोडण्यासाठी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:58 IST2017-08-12T22:57:55+5:302017-08-12T22:58:30+5:30
शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी संरक्षण भिंत ओलांडून जाण्यासाठी ...

शिस्त मोडण्यासाठी शक्कल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी संरक्षण भिंत ओलांडून जाण्यासाठी शक्कल लढविली. पाय ठेवण्यासाठी भींतीतील विटा काढून पोकळी निर्माण केली आहे. शिडीप्रमाणे या पोकळीचा वापर करुन विद्यार्थी सर्रास भींत ओलांडून ये-जा करतात.
परप्रांतीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून थेट श्रीनाथवाडी परिसरात शिरु नये, यासाठी संरक्षण भींत बांधण्यात आली. या भीतींला असलेला मार्ग संस्थेने नवी भींत उभारुन बंद केली. परप्रांतीय विद्यार्थी श्रीनाथवाडीत शिरणार नाही, याची आम्ही काळजी घेवू, असे आश्वासन प्रधान सचिव प्रभाकराव वैद्य यांनी अमरावतीकरांना दिले होते. परप्रांतीय विद्यार्थ्यांनी ताऊंच्या या आश्वासनाला हरताळ फासला.ते सर्रास भींत ओलांडून श्रीनाथवाडीत प्रवेश करतात. छायाचित्रात दाखविलेला एकच मार्ग हे विद्यार्थी वापर नाहीत. भींत ओलांडण्याचे अनेक मार्ग त्यांनी तयार केले आहे. भिंतीच्या पलीकडे श्रीनाथवाडी परिसर आहे. तेथून भुतेश्वर चौकाकडे जाऊन परप्रांतीय विद्यार्थी शौक पूर्ण करतात. मद्य व सिगारेटचे शौकीन असलेले परप्रांतीय विद्यार्थी परततानासुध्दा भिंत ओलांडूनच वसतिगृहात प्रवेश करतात. त्यांचे हे प्रकार सुरूच आहे. शिस्त व अनुशासनाचे धडे देणारे हव्याप्र हतबल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एसीपी गोर्डे म्हणतात, ठाणेदारांनाच विचारा
श्वानसेवन प्रकरणाविषयी पोलीस प्रशासन गांभीर्याने तपास करीत नसल्याचे वरिष्ठ अधिकाºयांच्या बोलावण्यावरूनच लक्षात येत आहे. सहायक पोलीस आयुक्त यशुदास गोर्डे यांना श्वानसेवन प्रकरणाच्या तपासासंदर्भात संपर्क केला असता ठाणेदारांनाच विचारा, असे टाळाटाळीचे उत्तर त्यांनी दिले.