शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वेंडर्स रेल्वेला भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या की, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते साहित्य विकण्यासाठी डब्यांमध्ये शिरतात. काही अक्षरशः खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रेल्वे गाड्यांच्या गेटसमोरच लावतात. प्रवाशांना गाडीतून उतरावे व चढावे कसे, याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागतो. खासकरून स्लीपर व जनरलच्या डब्यासमोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मोठी झुंबड असते.

श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कोरोना महामारी ओसरल्यानंतर रेल्वेगाड्या पूर्वपदावर आल्या. रेल्वे स्थानकसुद्धा प्रवाशांच्या गर्दीने फुलले. त्याचाच फायदा घेत बडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी धुडगूस चालवला आहे. अक्षरश: रेल्वेगाड्यांच्या गेटसमोरच विक्रेत्यांची गर्दी असते. प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते.  आरपीएफ, जीआरपीसह संबंधित रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये आहे.जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून बडनेराची सर्वदूर ओळख आहे. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करता येतो. कोरोना महामारी मागे पडल्याने आता रेल्वेगाड्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने  प्रवासी पर्यटनाला जात आहेत. पर्यायाने रेल्वेगाड्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहावयास मिळत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या की, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते साहित्य विकण्यासाठी डब्यांमध्ये शिरतात. काही अक्षरशः खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रेल्वे गाड्यांच्या गेटसमोरच लावतात. प्रवाशांना गाडीतून उतरावे व चढावे कसे, याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागतो. खासकरून स्लीपर व जनरलच्या डब्यासमोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मोठी झुंबड असते. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्यक्षात बडनेरा रेल्वे स्थानकावर मात्र विपरित चित्र असल्याचे वास्तव आहे.खाद्यपदार्थाची चढ्या दराने विक्री शाळांच्या सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांवरची गर्दी प्रचंड वाढली आहे. तप्त उन्हात पाणी, विविध प्रकारचे शीतपेय, खाद्यपदार्थाची चढ्या दरात विक्री होत आहे. मात्र, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गाच्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्याची मागणीही वेळोवेळी व्यक्त होते. 

मोबाईल चोरट्यांची अशीही शक्कलबडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर प्रवासी रेल्वेगाड्या हळुवार धावतात. गाडीच्या गेटवर किंवा खिडकीजवळच्या आसनावर मोबाईल पाहणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल पाडण्याचा  प्रयत्न चोरट्यांकडून यशस्वी होतो. अनेकांचे महागडे मोबाइल पळवून नेण्यात आले आहेत. काही प्रवासी तक्रार करतात, तर काही जण बाहेर गावचे असल्याने तक्रार केल्यास गाडी सुटून जाईल म्हणून तक्रार करीत नाहीत. 

 

टॅग्स :railwayरेल्वे