तळेगाव दशासर : तळेगाव ठाण्याच्या हद्दीतून जनावरे कोंबून कटाईकरिता नेताना दोन घटनेत सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील ११ बेलांची सुटका करण्यात आली. दोन चारचाकी वाहने पोलिसांनी ठाण्यात जमा केले आहे. या घटना नागपूर-औरंगाबाद हायवे महामार्गावरील दहेगाव येथे शनिवारी सकाळी ८ वाजता व दरम्यान घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी सय्यद जकीर सय्यद भुरू, मंगलपूर पीरियड (वाशीम), जि. वाशीम , शेख इर्शाद शेख रशीद, ता. ताजबाग, नागपूर आणि इतर पाच जणांविरुद्ध पशुवैद्यक कायद्यातील क्रुरतेचे प्रतिबंध, पशु संरक्षण संशोधन अधिनियम २०१५, आर/डब्ल्यू ६६/१९२ एमव्ही कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. आरोपींकडून सहा बैलांसह चारचाकी वाहन जप्त केले. सकाळी नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या माहितीवरून तळेगावचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.गोवंशांची कुऱ्हा मार्गे अवैध वाहतूकआरोपी अटक : नऊ जनावरे, वाहन जप्तकुऱ्हा : गोवंश जातीच्या जनावरांना निर्दयीपणे कोंबून नेणाऱ्या एक गाडीला सोमवारी पहाटे ५ वाजता कुऱ्हा पोलिसांनी पकडले. गोवंशाची अवैध वाहतूक करणे कायद्याने गुन्हा असतानाही लपून छपून असे प्रकार या परिसरात घडत आहेत.पीएसआय आशिष चौधरी, पोलीस रवींद्र, जीपचालक कडू हे रात्री हद्दीत गस्तीवर असताना जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पेट्रोलिग दारम्यात पकडले. एमएच १४ सीपी १५७८ क्रमांकाचे वाहन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रजवळ थांबविले असता, पोलिसांना गोवंश जातीचे नऊ जनावरे निर्दयीपणे कोंबून नेताना आढळले. पोलिसांनी वाहन चालक आरोपी शेख राझिक अब्दुल सत्तार (२४,रा. आर्वी जिल्हा वर्धा) विरुद्ध गुन्हा नोंदविला. त्या गोवंशाची गोरक्षणमध्ये रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जनावरांची अवैध वाहतूक; नऊ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:23 IST
तळेगाव ठाण्याच्या हद्दीतून जनावरे कोंबून कटाईकरिता नेताना दोन घटनेत सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील ११ बेलांची सुटका करण्यात आली. दोन चारचाकी वाहने पोलिसांनी ठाण्यात जमा केले आहे.
जनावरांची अवैध वाहतूक; नऊ आरोपींना अटक
ठळक मुद्दे११ बैलांची सुटका : दोन वाहने ठाण्यात जमा