वाळूची अवैध वाहतूक, पाच वाहने ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:04+5:302021-03-04T04:24:04+5:30

टाकरखेडा संभू :भातकुली तालुक्यातील गणोरी व खारतळेगाव परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने ताब्यात घेण्यात आली. प्रत्येक वाहनांकडून ...

Illegal transport of sand, five vehicles seized | वाळूची अवैध वाहतूक, पाच वाहने ताब्यात

वाळूची अवैध वाहतूक, पाच वाहने ताब्यात

Next

टाकरखेडा संभू :भातकुली तालुक्यातील गणोरी व खारतळेगाव परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने ताब्यात घेण्यात आली. प्रत्येक वाहनांकडून १ लाख १८ हजार रुपये याप्रमाणे पाच लाख ९० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांत गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

भातकुली तालुक्यात छुप्या मार्गाने काही ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार नीता लबडे यांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार नीता लबडे यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्याविरुद्ध मोहीम राबविली. दरम्यान गणोरी व खोलापूर परिसरात पथकाने धाडी टाकून अवैध वाहतूक करताना पाच वाहने जप्त केली. यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ टीसी २७, एमएच २२ - १८८७, एमएच ४ एस २६९३, मिनी ट्रक एमएच २७ एक्स २१३६ व ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ एल ६७२२ या वाहनांचा समावेश आहे. या वाहनधारकांविरुद्ध प्रत्येकी एक लाख १८ हजार याप्रमाणे पाच लाख ९० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. या पथकात मंडळ अधिकारी चोरपगार, गदगकर, हिवसे, अविनाश चव्हाण, महेश सोनोने, तलाठी बोरकर यांचा समावेश आहे. या पथकाने रात्रीच्या सुमारास तालुक्यात घटनास्थळी पोहोचून कारवाई केली.

Web Title: Illegal transport of sand, five vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.