गोवंशाची अवैध वाहतूक, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST2021-07-17T04:11:57+5:302021-07-17T04:11:57+5:30

पोलीस स्टेशन धारणी यांची कार्यवाही. धारणी पोलिसांची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त धारणी : गुरुवारी रात्री १२ वाजताच्या ...

Illegal transport of cattle, one arrested | गोवंशाची अवैध वाहतूक, एकाला अटक

गोवंशाची अवैध वाहतूक, एकाला अटक

पोलीस स्टेशन धारणी यांची कार्यवाही.

धारणी पोलिसांची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

धारणी : गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एका वाहनातील आठ गोवंश पकडून धारणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. इन्व्हर्टर बॅटरी

परतवाडाहून धारणीकडे एका वाहनामध्ये आठ गाई कोंबून कत्तलीसाठी आणल्या जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस कर्मचारी शंकरलाल कासदेकर व अमोल शेंडे यांना नाकाबंदी करण्याो आदेश दिले. जयस्तंभ चौकात रात्री १२ वाजता एमएच २७ बीएक्स ५३७७ क्रमांकाचे वाहन तेथे आले. त्यामधून पोलिसांनी आठ गोवंश बाहेर काढले. ८० हजारांची जनावरे व अडीच लाखांचे वाहन असा ३,३,०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी वाहनाचा चालक-मालक शेख वसीम शेख गफ्फुर (३०, रा. वाॅर्ड १६, धारणी) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Illegal transport of cattle, one arrested