‘रॉयल्टी’वर खोडतोड करुन अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:02 IST2017-09-23T00:02:22+5:302017-09-23T00:02:43+5:30

सूर्यास्तनंतर गौण खनिज, वाळू वाहतूक करता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे वास्तव महसूल विभागाने शुक्रवारी चार वाहने ताब्यात घेतल्यानंतर समोर आले.

Illegal traffic by trashing royalty | ‘रॉयल्टी’वर खोडतोड करुन अवैध वाहतूक

‘रॉयल्टी’वर खोडतोड करुन अवैध वाहतूक

ठळक मुद्देराजाश्रय कुणाला ? : प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: सूर्यास्तनंतर गौण खनिज, वाळू वाहतूक करता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे वास्तव महसूल विभागाने शुक्रवारी चार वाहने ताब्यात घेतल्यानंतर समोर आले. किंबहुना एकाच रॉयल्टीवर खोडतोड करून वारंवार वाळू वाहतुकीचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
अवैध वाळू वाहतूक रोखण्याची जबाबदारी महसूल, प्रादेशिक परिवहन आणि पोलीस विभागावर आहे. परंतु चिरिमिरी देऊन वाळू माफिया नदी घाटावरुन अवैध वाळू वाहतूक करीत आहेत. शहरात वर्धा, कन्हान, बेंबळासह अन्य नद्यांमधून वाळू आणली जाते. वाळू तस्करांनी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी दावणीला बांधल्याचे दिसून येते. वाळू वाहतूक सुरळीतपणे चालावी, यासाठी तस्करांनी प्रशासनात विभागनिहाय दलाल नेमले आहेत.त्यांच्या माध्यमातूनच अवैध वाळू वाहतुकीची मोहिम फत्ते केली जाते. महिन्याकाठी ठरलेली रक्कम सुद्धा संबंधिताकडे पोहचविली जाते, अशी माहिती आहे. नदी पात्रातून वाळू बाहेर जाताना त्याबाबत नदी घाटावर नोंदी असणे अनिवार्य आहे. परंतु वर्धा नदी घाटावर फे ब्रुवारी २०१७ पासून वाळू बाहेर गेल्याची नोंद नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला राजाश्रय असल्याचे दिसून येते.
नदी पात्रातून वाळू वाहतुकीला मनाई नाही. मात्र, वाळू वाहतूक ही नियमानुसार असावी. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहनातून आणली जात असेल तर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल. रॉयल्टी पासवर खोडतोडविषयी चौकशी होेईल.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी

गौण खनिज चोरी करणारी चार वाहने ताब्यात
अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा तापणार असल्याने शुक्रवारी महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारी चार वाहने ताब्यात घेतली आहेत. यात एम.एच ३१ सीक्यू ९३६६, एम.एच. २७ एक्स ०३५९, एम.एच. २७ डी ६३२२ आणि एम.एच.३१ एम २६४६ या क्रमांकाचा वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई नायब तहसीलदार धीरज मांजरे, मंडळ अधिकारी ढोक, चतूर, गावनेर, धुळे, पटवारी मनोज धर्माळे, सुनील उगले अजय पाटेकर, रमेश काळे यांनी केली.

Web Title: Illegal traffic by trashing royalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.