शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 8:45 PM

दहिगाव वर्तुळात ७ लाख ८५ हजारांची वृक्षतोड : दोन वनरक्षकांसह वनपाल निलंबित 

परतवाडा : मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल सुरूच आहे. बिहाली, भांडूम-एकताई यानंतर आता दहिगाव वर्तुळात ७ लाख ८५ हजारांची अवैध वृक्षतोड उघड झाली आहे. यात दोन वनरक्षकांसह वनपालांना निलंबित करण्यात आले आहे.

मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग, परतवाडा अंतर्गत संवेदनशील अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील दहिगाव वर्तुळात खिरपाणी आणि काकादरी बीटमध्ये चोरट्यांसह अतिक्रमितांनी हैदोस घातला आहे. यात पाच वनगुन्हे दाखल करण्यात आलेत. दहिगाव वर्तुळाचे वनपाल सुधीर हाते आणि खिरपाणी बीटचे वनरक्षक सुरेश बनारसे, काकादरी बीटचा अतिरिक्त प्रभार असलेले वनरक्षक विजय चव्हाण यांना वनविभागाने निलंबित केले आहे.

दहिगाव वर्तुळातील काकादरी बीटमध्ये ११ एप्रिलला दाखल गुन्ह्यात चोरट्यांनी २४ सागवान वृक्षांची कत्तल करीत ६२ हजार १०० रुपयांचे नुकसान केले. ११ जूनला दाखल गुन्ह्यात ७० सागवान वृक्षांची कत्तल करीत २ लाख ४८ हजार ५७४ रुपयांचे नुकसान केले. याच काकादरी बीटमध्ये अतिक्रमितांकडून १० हेक्टरहून अधिक क्षेत्रात वृक्षतोड करण्यात आली. २० ते २५ लोकांच्या जमावाकडून सामूहिक अतिक्रमण सुरू आहे. यात १४ जूनला दाखल वनगुन्ह्यात ५८ हजार ५६८ रुपयांचे, तर १६ जूनला दाखल वनगुन्ह्यात १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. खिरपाणी बीटमध्ये ५ मे रोजी दाखल वनगुन्ह्यात चोरट्यांनी ७२  सागवान वृक्षांची कत्तल करीत २ लाख ६५ हजार ९६२ रुपयांचे नुकसान केले. या दाखल पाच वनगुन्ह्यांत एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

१८ लाखांची वृक्षतोडवर्षभरात मेळघाटात १८ लाखांहून अधिक नुकसान या अवैध वृक्षतोडीत चोरट्यांनी केले आहे. ही केवळ उघड झालेली वृक्षतोड आहे. काही महिन्यांपूर्वी घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली वर्तुळात ५ लाख ३८ हजारांची, तर जारिदा वनपरिक्षेत्रांतर्गत भांडूम-एकताई परिसरात ३ लाख ७९ हजारांची अवैध वृक्षतोड निदर्शनास आली आहे. ही दोन्ही प्रकरणे ताजी असतानाच दहिगाव वतुर्ळातील ७ लाख ८५ हजारांच्या वृक्षतोडीने भर घातली आहे.मदतनीस नाहीतसंवेदनशील अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील दहिगांव वर्तुळात सात बीट आहेत. यातील एकाही बीटमधील वनरक्षकांकडे मदतनीस म्हणून वनमजूर नाहीत. ते सर्व वनमजूर व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले आहेत.शस्त्रांची मागणी दहिगाव वर्तुळातील वनपालासह वनरक्षकांनी अतिसंवेदनशील क्षेत्रातील जंगलतोडीला आळा घालताना चोरट्यांवर वचक बसविण्याकरिता वनअधिकाºयांकडे बरेचदा शस्त्रांची मागणी केली आहे. वनपालाने पिस्तोल, तर वनरक्षकाने बंदूक (रायफल) मागितली. पण, त्यांना ती शस्त्रे दिली गेली नाहीत.शस्त्रे कपाटातमेळघाट प्रादेशिक वनविभागाकडे जवळपास १५ ते २० शस्त्रे आहेत. त्यात काही पिस्तोल तर काही बंदूका (रायफल) आहेत. यातील काही बंदूका आरएफओंकडे पडून आहेत. पिस्तोल तर वनअधिकाºयांच्या अनिनस्त गोदरेजच्या कपाटात बंद आहेत.राखीव पोलीस दलदहिगाव वर्तुळातील काकादरी बीटमध्ये होत असलेल्या सामूहिक अतिक्रमणावर अंकुश लावण्याकरिता, जंगलतोड थांबविण्याकरिता राज्य राखीव पोलीस दलाची मागणी क्षेत्रीय वनकर्मचाºयांनी वनअधिकाºयांकडे केली आहे. राखीव पोलीस दल येईस्तोवर त्या भागात कॅम्प लावण्याकरिता अतिरिक्त तसेच  आवश्यक मनुष्यबळाची मागणीही त्यांनी  केली. पण, क्षेत्रीय वनकर्मचाºयांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.वनअधिकाºयांचे दुर्लक्षवनविभागाच्या मापदंडानुसार सहायक वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांनीही नियत क्षेत्रात नियमित भेटी देऊन अवैध वृक्षतोडीवर लक्ष केंद्रित करायला हवे. वनसंरक्षणार्थ उपाययोजना करणे आवश्यक ठरतात. परतवाडा उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या मुख्यालयापासून बिहाली तर मुख्य रस्त्यावर आहे. मापदंड असतानाही मेळघाटातील अवैध वृक्षतोड थांबण्याचे नाव घेत नाही. यात वनअधिकाºयांचे दौरे व नियत क्षेत्राच्या भेटी चर्चेत आल्या आहेत.

टॅग्स :Melghatमेळघाट