शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

अवैध गौण खनिज उत्खनन, दंडवसुलीवरुन वनविभाग संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:30 IST

शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे

अमरावती : शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित वनाधिकारी ‘वनगुन्हा तडजोड’च्या नावे गेल्या 37 वर्षांपासून कोट्यवधी रूपयांच्या महसूल वसुलीला छेद देत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वनजमिनीतून अवैध वाळू, खडी, दगड, माती किंवा दगड पावडर वाहतूक किंवा निदर्शनास आल्यास वाहनांसह व्यक्तिंविरूद्ध वनसंवर्धन कायदा, 1980 मधील कलम 2 (अ) ते (ड), 3 (ब), भारतीय वनकायदा 1927 कलम 26, 33, 35, 66, 69 वनगुन्हे जारी करण्याची नियमावली आहे. तसेच राज्य शासन अधिसूचना 11 मे 2015 मधील तरतुदीनुसार दर वसुली आणि राज्य शासन अधिसूचना 12 जून 2015 नुसार बाजारभावाचे पाचपट दंड रक्कम वसूल करणे आवश्यक आहे. मृद शास्त्र सॉईल सायन्सनुसार मातीचा 1 इंच थर तयार होण्यासाठी एक हजार वर्षांचा कालावधी लागतो. त्याचे मूल्य गृहीत धरून वनजमिनीतून अवैध गौण खनिज उत्खन्नन झाल्यास प्रति घनमीटर 10800 रूपये याप्रमाणे मूळ गौण खनिजाची दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी  कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या 37 वर्षांत राज्याच्या वनविभागात अवैध गौण खनिजाचे प्रकरण उघडकीस आल्यास केवळ गुन्ह्यापोटी दंडाची रक्कम वसूल करून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार सुरू आहे. हा प्रकार देशद्रोहासमान असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर स्वरूपाची फौजदारी कारवाई केल्यानंतरच त्याला आळा बसेल, हे सत्य आहे.

‘वन’ संज्ञेच्या जमिनीतून केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय गौण खनिजाचे उत्खन्नन केल्यास वनगुन्हे दाखल करणे अनिवार्य आहे. परंतु, वन अधिकारी बहुतांश प्रकरणी अजामीनपात्र तसेच दखलपात्र वनगुन्हे जारी करतात. इतर फौजदारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हे नोंदवित नाहीत. गौण खनिजाचे राजस्व शुल्क व बाजारभावाच्या किमतीच्या पाचपट दंड वसूल करतेवेळी वनगुन्हा तडजोडप्रकरणी वापरले जात नाही. या गंभीर बाबीला उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल दर्जाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे वनहद्दीतून अवैध गौण खनिज उत्खन्नन करणाऱ्या माफियांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे चित्र राज्यभरात आहे.

असे आहेत अवैध गौण खनिज दंड वसुलीचे निकषराजस्व शुल्क    बाजारभाव पाचपट दंड    एकूणवाळू- 1100         49500            50600खडी- 550           8450             9000दगड- 550           4905             5455  माती- 550           2000             2550दगड पावडर- 550     4905              5455

वनजमिनीतून अवैध गौण खनिज उत्खनन वनगुन्ह्याचे दंडात्मक प्रकरण तपासले जातील. यात काही नियमबाह्य आढळल्यास चौकशीअंती संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू. उमेश अग्रवाल,प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर 

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभागforestजंगल