शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भूखंड, शेतजमिनीचे नियमबाह्य विभाजन; बिल्डर्सच्या इशाऱ्यावर तहसीलदारांचे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 10:59 IST

Amravati : विभागीय आयुक्तांकडे तक्रार, हजारांपेक्षा जास्त प्रकरणे ?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहर असो ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी १ जानेवारी २०२४ पासून बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम या संकेतस्थळ अंतर्गत भूखंडाचे विभाजन आणि एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन राबविणे अनिवार्य आहे. मात्र, अमरावती तहसीलदारांनी ही ऑनलाइन प्रणाली गुंडाळून ऑफलाइन प्रक्रिया राबवित मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आणि शेतजमिनींचे नियमबाह्य विभाजन करण्याचे आदेश पारित केले आहे. यात तब्बल एक हजारांपेक्षा जास्त शेतजमिनींचा समावेश असून 'लक्ष्मी' दर्शन झाल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे पारित आदेशान्वये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

येथील पोटे फॉर्म स्थित सर्वेश अंबाडकर यांनी विभागीय आयुक्त निधी पांडेय यांच्याकडे १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीत अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी खुले भूखंड, शेतजमिनींचे नियमबाह्य विभाजन केलेल्या कारनाम्याची जंत्री सादर केली आहे. तहसीलदार लोखंडे यांनी 'व्हेटो पॉवर'चा वापर करताना खुले भूखंड, शेतजमिनींचे विभाजन करून महानगरपालिकेचा खुला भूखंड कर आणि नगर रचना विभागाचे विकास शुल्क अशा प्रकारे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला आहे. जमिनीचे विभाजन करताना तहसीलदार लोखंडे यांनी वरिष्ठांचा अभिप्राय न मागविता बेकायदेशीर आदेश पारित केले आहे. ना चालान, ना वरिष्ठांचे गाइडलाइन असा अफलातून कारभार तहसीलदार लोखंडे यांनी बिल्डर्सच्या इशाऱ्यावर जमिनीचे विभाजन करताना केल्याचे तक्रारीत म्हटल्याचे नमूद आहे.

१७ ला अर्ज अन् १६ ऑक्टो. रोजी आदेश?रेवसा येथे रा. मा. क्र.एम.आर.सी- ८१ येथे १४२/ २०२३-२०२४ नुसार पारित शेतजमिनीच्या विभाजनासाठीचा अर्ज १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिला होता. मात्र तहसीलदार लोखंडे यांनी याप्रकरणी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजे एक दिवस अगोदर आदेश पारित करण्याची किमया केली आहे. खुले भूखंड वा शेतजमिनींचे विभाजनाच्या प्रकरणी नकाशे हे नियमानुसार जोडण्यात आले नसून त्यावर जावक क्रमांक व शेरा नोंदविला नाही.

तहसीलदार लोखंडेची चौकशी करा, विभागीय आयुक्तांना साकडे 

  • तिवसा येथे महिला छळप्रकरणी विशाखा समितीची चौकशी
  • चिखली तहसीलमध्ये निवडणूक निधीचा घोळ 
  • अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आर्थिक व्यवहारात अटक 
  • अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचे प्रकरण
  • अमरावती येथील सोमेश्वर संस्थानच्या अनधिकृत कुळाचे आदेश, ५० कोटींचा गोलमाल
  • सातबारावर भोगवटदार २ वरून भोगवटदार १ करून बेकायेदशीर १०० पेक्षा जास्त ले-आउट मंजूर

"खुले भूखंड आणि शेत जमिनीचे विभाजन करताना कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य आदेश पारीत केलेले नाही. याप्रकरणी अगोदरही मंत्रालयात तक्रार करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशीदेखील सुरू असून यात कोणताही गैरप्रकार झाला नाही. आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असावी." - विजय लोखंडे, तहसीलदार अमरावती

"अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी नियमबाह्य प्रकरणाचा मूर्तरूप देत मोठी मोहमाया जमविली आहे. ज्या ठिकाणी ते तहसीलदारपदी कार्यरत होते, तेथे त्यांनी प्रताप केला आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे ही विभागीय आयुक्तांना तक्रारीन्वये सादर केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या चौकशीची मागणी आहे." - सर्वेश अंबाडकर, तक्रारदार

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद