वरूडला आयजी, एसपीने दिली अचानक भेट ! कोविडसंदर्भात घेतला आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:51+5:302021-05-11T04:13:51+5:30
वरूडला आयजी, एसपीने दिली अचानक भेट ! कोविडसंदर्भात घेतला आढावा ! शहराची पाहणी ! वरूड : तालुक्यातील वाढतात ...

वरूडला आयजी, एसपीने दिली अचानक भेट ! कोविडसंदर्भात घेतला आढावा !
वरूडला आयजी, एसपीने दिली अचानक भेट ! कोविडसंदर्भात घेतला आढावा !
शहराची पाहणी !
वरूड : तालुक्यातील वाढतात कोविडचा प्रादुर्भाव पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वरूड शहराला अचानक भेट दिली. यावेळी वरूड बेनोडा आणि शेंदूरजनाघाट पोलीस अधिकऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस वाचनालयाची सुद्धा पाहणी केली. शहरातील लॉकडाऊनबाबत दौरा करून पाहणी केली.
शहरासह तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि यावरील उपाययोजनेचा आढावा घेण्याकरिता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, उपविभागीय अधिकरी नितीनकुमार हिंगोले यांनी पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्याच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यामध्ये लॉकडाऊन आणि कायदा व सुव्यवस्थेची माहिती जाणून घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. पोलीस वाचनालयाची सुद्धा पाहणी केली. शहरातील लॉकडाऊनबाबत दौरा करून पाहणी केली. यावेळी वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, शेंदूरजनाघाट ठाणेदार श्रीराम गेडाम , बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह आदी अधिकारी उपस्थित होते.