शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आयएफएस झाले, पेढेही वाटले; पोस्टिंग मात्र नाहीच

By गणेश वासनिक | Updated: June 26, 2025 13:12 IST

Amravati : आनंद क्षणभंगुर, भारतीय वनसेवेतील ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वनविभागात मनमर्जी कारभार हाकला जात असून, महिनाभरापूर्वी आयएफएस झालेल्या २७ वनाधिकाऱ्यांनी पेढे वाटले. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. मंगळवारी (दि. २४) ४० आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश धडकले. मात्र, यात २४ नव्या आयएफएस यांना पोस्टिंगसाठी ताटकळत ठेवण्याचा प्रकार घडला आहे.

राज्य शासनाच्या तन व महसूल विभागाने २४ जून रोजी महाराष्ट्रातील ४० आयएफएस अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत, यात संजीव गौड, विवेक खांडेकर या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (दुय्यम) पदावर बढती मिळाली, तर यामध्ये ४ मुख्य वनसंरक्षक, ३ वनसंरक्षक आणि २७उपवनसंरक्षकांची पोस्टिंग देण्यात आली आहे. नागपूरच्या वनभवनात गत ३ वर्षापासून ठाण मांडून बसलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार यांच्या खुर्चीमध्ये बदल करण्यात वनविभाग नापास ठरला, तर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगांवकर यांना वर्षभरातच चंद्रपूरमधून हटविण्यात आले आहे. आयएफएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी चांगली पोस्टिंग मिळावी, यासाठी काही पदे अपग्रेड करण्यात आल्याचे या बदली यादीवरून दिसून येते.

२३ अधिकारी वेटिंगवर

  • चार वर्षापासून राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना आयएफएस पोस्टिंग देण्यात आली नव्हती.
  • ५ वर्षाच्या कालावधीनंतर अखेर २७ वनाधिकाऱ्यांना आयएफएस अवॉर्ड मिळाले.
  • २ जून रोजी आदेश पारीत झाल्यानंतर २३ दिवसांनीसुद्धा पोस्टिंग देण्यात आलेली नाही.
  • ४० आयएफएस यांच्या बदल्यांच्या यादीत नव्याने आयएफएस झालेल्या २७ पैकी केवळ चार अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली असून, उर्वरित २३ अधिकारी वेटिंगवर आहेत.

अतिरिक्त पदांवर डोलारा

  • वनविभागात आरएफओ ते सीएफ अशी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. १० अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार असून, काहींना तर अतिरिक्त कार्यभार स्वतःकडे ठेवून कार्यमुक्त होण्याचे आदेश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) विवेक खांडेकर यांनी काढले आहेत.
  • विवेक खांडेकर यांना प्रधान २ मुख्य वनसंरक्षक पदावर बढती दिल्यानंतरही त्यांच्याकडे कार्मिकच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाची जबाबदारी आहे. खांडेकर यांना कोण कार्यमुक्त करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागात पदे रिक्त ठेवण्यावर अधिक भर दिला जात आहे.

आयएफएस अधिकाऱ्यांची चलाखी

  • महाराष्ट्रात आयएफएस लॉबी बदली आणि पदोन्नतीमध्ये सुविधा बघत भावसे नियम १९६६ उपनियम क्रमांक ४ (२) चा योग्यरीत्या उपयोग करतात.
  • या बदली यादीमध्ये संजीव गौड यांच्यासाठी पद अपग्रेड केले असून, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, जितेंद्र रामगांवकर यांच्यासह वनसंरक्षक आशिष ठाकरे, डॉ. शिवबाला एन. आणि उपवनसंरक्षक विवेक हौशिंग, जी. गुरुप्रसाद, तुषार चव्हाण, कुलराज सिंह, कृष्णा भवर, आदिती भारद्वाज, लक्ष्मण पाटील, एन. जयकुमारन यांची सुविधा करण्यात आली, तर राज्य कॅडरची चार पदे कमी करण्यात आली आहेत.
टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग