निंभी येथे आदर्श विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:09 IST2021-07-03T04:09:21+5:302021-07-03T04:09:21+5:30

एकीकडे मोठ्या धूमधडाक्यात लग्न करण्याची आस धरणारे कोरोनाच्या प्रतिबंधामुळे त्रस्त झाले असताना पारंपरिक लग्नाच्या पद्धतीला फाटा देऊन मोर्शी तालुक्यातील ...

Ideal wedding ceremony at Nimbhi | निंभी येथे आदर्श विवाह सोहळा

निंभी येथे आदर्श विवाह सोहळा

एकीकडे मोठ्या धूमधडाक्यात लग्न करण्याची आस धरणारे कोरोनाच्या प्रतिबंधामुळे त्रस्त झाले असताना पारंपरिक लग्नाच्या पद्धतीला फाटा देऊन मोर्शी तालुक्यातील निंभी येथील सुभाषराव अघाडे यांची ज्येष्ठ कन्या अंकिता हिला बघण्यासाठी अचलपूर तालुक्यातील धामणगाव (गढी) येथील गजानन गिहिरे यांचा ज्येष्ठ मुलगा सचिन हा कुटुंबातील नातेवाईकांसोबत पोहोचला. रीतीरिवाजाप्रमाणे मुलगी बघण्याचा सोपस्कार पार पडला. मुलाला मुलगी पसंत असल्याचे मुलीच्या कुटुंबातील नातेवाईकांना सांगण्यात आले. वर-वधू कडील नातेवाइकांनी परिस्थितीची जाणीव ठेवून क्षणाचाही विलंब न करता शासन व प्रशासनाचे नियम व अटींचे पालन करून त्याच दिवशी लग्नसोहळा सुद्धा उरकून घेतला. या आदर्श विवाह लग्नसोहळ्याला निंभीचे सरपंच अरुण रामचंद्र गायकी, माजी सरपंच शरदराव गायकी, शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे, मोर्शीचे सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद देशमुख, नीलेश ज्ञानेश्वर अघाडे, रवींद्र कडू, संजय रामभाऊ साबळे, यांचेसह वर-वधू कडील नातेवाईक मंडळी उपस्थित होती.

Web Title: Ideal wedding ceremony at Nimbhi