शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

आदर्श शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:36 IST

जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराने १५ शिक्षकांना बुधवारी गौरविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सन्मानित

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराने १५ शिक्षकांना बुधवारी गौरविण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच आणि राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त सहा शिक्षकांचा सन्मानही जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्र्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सन २०१५-१६ या वर्षातील १०, तर २०१७-१८ मधील पाच प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. विशेष अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, सभापती सुशीला कुकडे, शिक्षण समिती सदस्य पूजा येवले, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र पाटील, अलका देशमुख, शिल्पा भलावी, वैशाली बोरकर, बाळासाहेब हिंगणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) शरद खंडागळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट अध्यापन कार्य करणाºया पाच शिक्षकांचाही प्रोत्साहनपर गौरव करण्यात आला. सहा शिक्षकांना शासनाकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी नितीन गोंडाणे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.यावेळी उपाध्यक्ष ढोमणे, सभापती देशमुख, शिक्षणाधिकारी तुरणकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी तुरणकर, संचालन विस्तार अधिकारी नितीन उंडे, तर आभार प्रदर्शन डब्ल्यू.जी. बोलके यांनी केले. कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, तुषार पावडे, बोके आदींनी परिश्रम घेतले.पुरस्काराचे मानकरीसन २०१५-१६ मध्ये प्रफुल्ल वाठ (भातकुली), नंदकिशोर रायाबोले (दर्यापूर), उमेश भगोले (धामणगाव रेल्वे) यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला. वैशाली भोजने-देवरे (अंजनगाव सुर्जी), धर्मराज रसे (अचलपूर), विलास भोंडे (वरूड), देवेंद्र फड (नांदगाव खंडेश्वर), अशोक दातीर (चांदूर रेल्वे), प्रकाश काळे (तिवसा), पुष्पा बिडकर (चांदूर बाजार), तर सन २०१६-१७ मधील गजानन कासमपुरे (अचलपूर), किरण विष्णू आडे (चिखलदरा), विनायक लकडे (भातकुली), सचिन अवघड (तिवसा), अर्चना माहुरे (वरूड) यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.विशेष गौरवाने यांचाही सन्मानराज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावल्याबद्दल ज्योती उभाड, राजकुमार खर्चान (भातकुली), वैशाली ढाकुलकर (अमरावती), वैशाली सरोदे, अशोक सोनवने (चिखलदरा), देवकी अवघड (दर्यापूर) यांच्यासह सुषमा भेले, (भातकुली), राजू विरुळकर (तिवसा), निसार वाजेदखाँ (नांदगाव खंडेश्वर), किशोर परतेकी (धामणगाव रेल्वे), प्रमोद मांडवगणे (चांदूर रेल्वे) यांचा प्रोत्साहनपर विशेष गौरव जिल्हा परिषदेने केला.उमेश भगोले यांचा मृत्यूपश्चात बहुमानधामणगाव रेल्वे पंचायत समितीअंतर्गत वकनाथ येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत उमेश भगोले जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले. मात्र, पुरस्कार मिळण्याआधी १५ आॅक्टोबर २०१६ रोजी त्यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजया भगोले यांनी नितीन गोंडाणे, जयंत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.