Navneet Rana: हनुमान चालिसावर माझा विश्वास, 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदेंनाच मिळणार: नवनीत राणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:26 IST2023-01-13T15:26:00+5:302023-01-13T15:26:46+5:30
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

Navneet Rana: हनुमान चालिसावर माझा विश्वास, 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदेंनाच मिळणार: नवनीत राणा
अमरावती-
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल असा माझा विश्वास आहे. जे बाळासाहेबांचे विचार घरात ठेवू शकले नाहीत ते सत्तासाठी काय संघर्ष करणार? बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे आणि त्यांनाच धनुष्यबाण मिळेल, असं नवनीत राणा म्हणाल्या.
"उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाइव्हवर सरकार अडीच वर्ष चाललं. हनुमान चालीसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला १३ दिवस या उद्धव ठाकरेंनी तुरुंगात टाकलं. बाळासाहेबांचे विचारच यांनी घरात ठेवले नाहीत मग यांचं काय होईल?", अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
"जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत. ते सत्तसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे आणि त्यांनाच धनुष्यबाण मिळेल. माझा देवावर विश्वास आहे. माझा हनुमान चालिसावर प्रचंड विश्वास आहे. बाळासाहेबांना मानणारे एकनाथ शिंदे यांनाच पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण मिळेल आणि त्या चिन्हावर ते आपले उमेदवार रिंगणात उतरवतील", असंही नवनीत राणा म्हणाल्या.