बारावीच्या निकालाची आता लगीन घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST2021-07-23T04:10:20+5:302021-07-23T04:10:20+5:30
अमरावती : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या निकालाची लगीनघाई सुरू झाली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणदान करण्याचे काम ...

बारावीच्या निकालाची आता लगीन घाई
अमरावती : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या निकालाची लगीनघाई सुरू झाली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणदान करण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना गुणदान करण्यात येत आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे गुण, श्रेणी आणि इतर माहिती मंडळाच्या संकेत स्थळावर अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तपासणी करून महाविद्यालयांना ते गुण सादर करावयाचे आहे. गुण अपलोड करण्याचे काम आटोपून २३ जुलै रोजी दहावीचा अकरावी आणि बारावीच्या निकालाची संकलित इतर प्रपत्रे आणि संपूर्ण माहितीची प्रत सादर विभागीय शिक्षण मंडळाकडे २४ पर्यंत जमा करावी, अशा सूचना मंडळाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. ही गुणदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ३१ जुलै दरम्यान बारावीचा निकाल लागण्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहावीच्या सर्वोच्च तीन विषयाचे गुण, अकरावीचे गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनातून मिळणारे गुण या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येणार आहे. विविध शाखांमध्ये विविध निकष तयार करण्यात आले असून, त्यांच्या साहाय्याने गुणदान करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये हे गुणदान पाठवण्याची प्रक्रिया केली सुरू आहे. त्यानंतर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
कोट
सध्या बारावीच्या निकालाचे अनुषंगाने महाविद्यालय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. निकालासंदर्भातील माहिती येत्या २४ जुलैपर्यंत मंडळाकडे प्राप्त होणार आहे.
- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती