वॅगन कारखान्याकडे धावतात शेकडो ट्रक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:05+5:302020-12-11T04:38:05+5:30
फोटो जे-१०-बडनेरा फोल्डर बड़नेरा : रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याकडे शेकडो ट्रक अवजड साहित्य घेऊन दररोज रहिवासी वस्त्यांमधून धावतात. रस्त्याची ...

वॅगन कारखान्याकडे धावतात शेकडो ट्रक !
फोटो जे-१०-बडनेरा फोल्डर
बड़नेरा : रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याकडे शेकडो ट्रक अवजड साहित्य घेऊन दररोज रहिवासी वस्त्यांमधून धावतात. रस्त्याची दर्दशा झाली आहे. धुळीने व भरधाव ट्रकमुळे परिसरवासी कमालीचे भयभीत झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम सुरू आहे. याठिकाणी लागणारा सर्व अवजड साहित्य पाचबंगला परिसराच्या रहिवासी वस्त्यांमधून जातो. याच मार्गाने अनेक गावखेड्या वरील लोक नियमित कामकाजासाठी बडनेरासह अमरावती शहरात येत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ राहते. मात्र वॅगन कारखान्याकडे जाणाऱ्या शेकडो ट्रकमुळे हा रस्ता जीवघेना ठरत आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया गाव खेडयांसह पाचबंगला परिसरवासीयांच्या आहेत. पक्का रस्ता व्हावा, यासाठी महिला, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी आंदोलने केलीत. मात्र रेल्वे व इतर रस्त्याशी संबंधित प्रशासनाने टोलवाटलवी केल्याचे काम केल्याने हा रस्ता जैसे थे आहे. सध्यादेखील या खराब रस्त्यावरून शेकडो मुरमाचे ट्रक धावत आहेत. त्यापासून पाचबंगला परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धूळ उडत असल्याने नागरिक त्रस्त आहे. या गंभीर बाबीची दखल दोन वर्षांपासून घेतली जात नसल्याची स्थिती आहे. काटआमला, उत्तमसरा, बोरगाव, गणोरी, गणोजा भातकुली यासह दर्यापूर, मूर्तिजापूर आदी गावांकडे हा रस्ता गेलेला आहे. वॅगन दुरुस्ती कारखान्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळेच हा रस्ता खराब झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बड़नेऱ्यात वॅगन दुरुस्ती कारखाना होत आहे. त्याचे शहरवासीयांनी स्वागतच केले मात्र या कारखान्याचे काम संथ गतीने सुरू आहे अनेकांना त्यापासून नाहक त्रास सहन करावा लागतो आहे .
प्रतिक्रिया
वॅगन कारखान्याकडे जाणाऱ्या गाड्यांमुळे आमच्या परिसरातील रस्ता खराब झाला आहे धुळीमुळे आमचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तात्काळ पक्का रस्ता करावा.
- प्रतिभा नकाशे,
पाचबंगला
प्रतिक्रिया
अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या ट्रक्स मुळे रस्ता खराब झाला नव्याने रस्ता तयार करावा वॅगन कारखान्याकडे शेकडो ट्रक्स जातात त्यापासून परिसरवासीय भयभीत आहे.
- कमल शेगोकार,
बड़नेरा