शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो विद्यार्थ्यांनीमेडिकलच्या जागा बळकावल्या? जमातीचे प्रमाणपत्र रद्द पण 'एमबीबीएस'ची पदवी नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:02 IST

Amaravati : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, 'मन्नेरवारलू' जमातीचे प्रमाणपत्र केले रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वोच्च न्यायालयाने चैतन्या पाळेकर या विद्यार्थिनीचे 'मन्नेरवारलू' जमातीचे प्रमाणपत्र 'एमबीबीएस'चे शिक्षण पूर्ण झाल्यावर अवैध ठरवले होते. तर तिच्या पदवीला संरक्षण देत वडिलांना केवळ ५ लाखांचा दंड केला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा असेच एक प्रकरण उजेडात आले असून, वेदकुमार हणमनलू घटांजी या उमेदवाराबाबत १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अधोरेखित झाले आहे.

मुळातच विशेष मागास प्रवर्गात येणाऱ्या 'मनेरवार' जातीच्या वेदकुमार घटांजी यांनी लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयामार्फत आणि नंतर मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'मन्नेरवारलू' अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी त्यांचे जात प्रमाणपत्राचा दावा २९ ऑक्टोबर २०२० रोजी अवैध ठरवला होता. या निर्णयाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च या औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेऊन रिट याचिका क्र. ७८३९/२०२० दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०२४ रोजी समितीचा निर्णय कायम ठेवून याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका क्र. २६४६१/२०२४ दाखल केली होती.

सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती विजय बिष्णोई यांनी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम निर्णय देत न्यायालयीन लढाई सुरू असताना अर्जदाराने एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यामुळे शिक्षण वाया जाऊ नये, म्हणून वैद्यकीय पदवी संरक्षित केली. मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून यापुढे अनुसूचित जमाती आरक्षणाचा कोणताही लाभ मिळणार नाही, असे कडक शब्दात फटकारले आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथील तत्कालीन आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये मन्नेरवारलूसंबंधी सविस्तर अहवाल सचिवांना पाठवला आहे. आठ वर्षांपासून अहवाल दडपून ठेवण्यात आला, तेव्हाच 'मन्नेरवारलू' वगळला असता तर अशी परिस्थिती दिसली नसती, असे मत ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रमोद घोडाम यांनी व्यक्त केले.

एमबीबीएस प्रवेशाच्या अनुसूचित जमातीच्या राखीव जागा वर्षानुवर्षे खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर बळकावल्या जात आहेत. त्यांची पदवी न्यायालयाकडून संरक्षित होत आहे. त्यामुळे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

"कंडिशनल जातवैधता देण्याची कायद्यात कुठेही तरतूद नाही. तरीही याआधारे आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी आमच्या घटनात्मक हक्काच्या मेडिकलच्या जागा बळकावल्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर कायद्यातील तरतुदींनुसार पदवी रद्द होणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. सात टक्क्यांपैकी चार टक्के आरक्षण गिळंकृत केले. केवळ तीनच टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे. हा देश आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवण्याची हमी देईल का?"- डॉ. पुणा गांडाळ, अध्यक्ष, ट्रायबल डॉक्टर्स फोरम

English
हिंदी सारांश
Web Title : Hundreds grab medical seats using fake caste certificates; degrees protected.

Web Summary : Despite caste certificates being invalidated, students retain medical degrees, sparking outrage. Court protects degrees while invalidating certificates. This injustice deprives genuine tribal students of opportunities, highlighting reservation flaws.
टॅग्स :Amravatiअमरावतीdoctorडॉक्टरEducationशिक्षण