बडनेऱ्यात शेकडो इंजेक्शन फेकले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:22+5:30

बडनेरा ते अकोला मार्गावर पाळा फाट्यापुढील नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला इंजेक्शन टोचल्यानंतर काही अंशी इंजेक्शनमध्ये त्या आजारी व्यक्तीचे जंतू फेकण्यात आलेल्या अशा इंजेक्शनमध्ये राहू शकतात.

Hundreds of injections were thrown into the drain | बडनेऱ्यात शेकडो इंजेक्शन फेकले नाल्यात

बडनेऱ्यात शेकडो इंजेक्शन फेकले नाल्यात

ठळक मुद्देवाय पॉइंट : जंतुसंसर्गाची भीती; कारवाई केव्हा?

श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : राष्ट्रीय महामार्गाला वाय पॉइंटच्या पुढे छेदून जाणाऱ्या नाल्यात रविवारी शेकडो इंजेक्शन आढळून आली आहेत. स्वातंत्र्यदिनी दुपारी ४ वाजता आढळलेल्या या साठ्याबाबत प्रशासन २४ तासांनंतरही अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. या वापरलेल्या इंजेक्शनमधील द्रव्य पाण्यात मिसळून नाल्याच्या काठावरील वस्तीला जंतुसंसर्गाची भीती व्यक्त होत असून, कारवाईची मागणी केली जात आहे.
बडनेरा ते अकोला मार्गावर पाळा फाट्यापुढील नाल्यात वापरलेले शेकडो इंजेक्शन फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला इंजेक्शन टोचल्यानंतर काही अंशी इंजेक्शनमध्ये त्या आजारी व्यक्तीचे जंतू फेकण्यात आलेल्या अशा इंजेक्शनमध्ये राहू शकतात. विविध आजारांसाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग पसरवू शकतात. यापासून आजार वाढू शकतो. ज्या भागात इंजेक्शन फेकण्यात आले, तेथे पाणी आहे. आजूबाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे पाळीव पशूंसाठी चारा तयार झाला आहे. पशू याच परिसरात चरून तेथील पाणी पितात. त्यांच्याकरवी मनुष्यालाही विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन शेकडो इंजेक्शन रस्त्यावर फेकण्याचा निष्काळजीपणा दाखविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी परिसरातील शेतमालक, पशुपालक व नागरिकांची मागणी आहे.

येथेच आहे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल
बायोमेडिकल वेस्ट नष्ट करण्याची (डिस्पोजल) प्रक्रिया शासनाने ठरवून दिली आहे. त्याचा प्रकल्प बडनेरानजीक दुर्गापूर मार्गावर आहे. या ठिकाणी हे इंजेक्शन न देता, नाल्यात, तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकण्यामागे हेतु काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२४ तासांनंतरही ‘जैसे थे’च
सदर प्रतिनिधीने स्वातंत्र्यदिनी दुपारी ४ वाजता या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती घेतली. कोरोनाकाळात अतिशय दक्षता बाळगणाºया आरोग्य वा महसूल प्रशासनाला मात्र त्याची माहिती मिळाली नव्हती. वृत्त लिहिस्तोवर हा साठा वाहत्या नाल्यातील गवतात ‘जैसे थे’ पडून होता.

Web Title: Hundreds of injections were thrown into the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.