परस्परविरोधी भांडणात दोन महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:44+5:302021-03-05T04:13:44+5:30

अमरावती : एकाच मोहल्ल्यात राहत असलेल्या दोन कुटुंबात परस्परविरोधी भांडणात दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना खोलापुरीगेट ठाणे हद्दीतील सागर ...

Humiliation of two women in a conflict | परस्परविरोधी भांडणात दोन महिलांचा विनयभंग

परस्परविरोधी भांडणात दोन महिलांचा विनयभंग

अमरावती : एकाच मोहल्ल्यात राहत असलेल्या दोन कुटुंबात परस्परविरोधी भांडणात दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना खोलापुरीगेट ठाणे हद्दीतील सागर नगरात बुधवारी घडली. भांडणानंतर परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद सारीम अब्दुल सलीम (१९), अब्दुल अहमद अब्दुल समद (३२, दोन्ही रा. सागर नगर),मुन्ना समद (२५), तीन महिला ( रा. सागर नगर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४(अ), १४३, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपी मोहम्मद हा फिर्यादीच्या घरी आला व घराची झडती घेऊ लागला. झडती घेण्यास मनाई केली असता, आरोपी इतर पुरुष आरोपीला बोलावून महिलेचे कपडे फाडून विनयभंग केला. तसेच महिला आरोपीनेसुद्धा मारहाण केल्याची तक्रार आहे. दुसऱ्या गटातील महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी शेख अजीम शेख अलीम (२२), शेख मोबीन शेख अलीम (२०) शेख इरशाद मोहम्मद खान (२०, सर्व रा. सागर नगर) तसेच एक महिला असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादविची कलम ३५४(अ)३२३,५०४, ३४ अन्यवे गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादीचा मुलगा हा आरोपी महिलेच्या राहत्या घरी गेला व तेथे नळावर हात धुण्यास त्याला मनाई केली. या कारणावरून मुलगा हा मामाच्या घराजवळ उभा असता येथे किरकोळ कारणावरून भांडण करून पुरूष आरोपीने संगमनत करुन महिलेचा विनयभंग केला व महिलेस शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली. पुढील तपास खोलापुरीगेट पोलीस करीत आहेत.

Web Title: Humiliation of two women in a conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.