शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा आर्द्रता, रात्रीच्या थंडीने पुन्हा बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 21:53 IST

सध्या दिवसाच्या तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांच्या दोन दिवसांतील सर्वेक्षणामध्ये हिरव्या बोंडात १० टक्क््यांच्या वर प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे कृषी विद्यापीठाने सर्व जिल्ह्यांना अलर्ट दिला.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाचा अलर्ट : पोषक वातावरणाने प्रादुर्भाव वाढला, व्यवस्थापन महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दिवसाच्या तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांच्या दोन दिवसांतील सर्वेक्षणामध्ये हिरव्या बोंडात १० टक्क््यांच्या वर प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे कृषी विद्यापीठाने सर्व जिल्ह्यांना अलर्ट दिला.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशी, हलक्या ते मध्यम जमिनीतील पाण्याचा ताण पडलेल्या कपाशीच्या तुलनेत संरक्षित ओलिताच्या कपाशीत व भारी जमिनीमधील हिरव्या कपाशीमध्ये जास्त आढळून आलेला आहे. या अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान २९ ते ३२ अंश सेल्सीअस व रात्रीचे तापमान ११ ते १४.५ अंश सेल्सीअस, तर दिवसाची आर्द्रता ७१ ते ८० टक्के, तर रात्रीची आर्द्रता २६ ते ३५ टक्के असणे अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या ते आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाचे सरासरी तापमान ३५ अंश असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. मात्र, आता तापमान जसजसे कमी होईल तशी हिरव्या बोंडातील गुलाबी अळीच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली.गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी आठवड्याला नियमित सर्वेक्षण करून फेरोमोन सापळ्यामधील पतंग मोजून नष्ट करावे. सापळ्यामधील कामगंध वड्या (ल्यूर) वेस्टनावरील सुचनेनुसार बदलाव्या. फेरोमेन सापळे लावून (एकरी १५ ते २० याप्रमाणे) मोठ्या प्रमाणात अडकलेले पतंग नष्ट करणे महत्त्वाचे आहे.आठवड्याला शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी एकरी २० झाडे निवडून त्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले आणि बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्यांची संख्या मोजावी. यापैकी दोन किडक बोंडे किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजून शिफारसीच्या कीटकनाशक फवारणी करण्याचे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख अनिल ठाकरे व कृषी विकास अधिकारी कुरबान तडवी यांनी केले.असे करा तातडीचे व्यवस्थापनअळीच्या प्रादुर्भावास नुकतीच सुरुवात झाली असल्यास ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही ३० मिलि किंवा डल्टामेथ्रीन २.८० टक्के प्रवाही १० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव जास्त आहे, तेथे मिश्र कीटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझालॉस ३५ टक्के + डेल्टामेथ्रीन १ टक्के - १७ मिलि किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल ९.३ टक्के + लॅब्डासायहॅलोथीन ४.६ टक्के - ५ मिलि किंवा इंडॉक्झीकार्ब १४.५ टक्के + अ‍ॅसीटामाप्रीड ७.७ टक्के - १० मिलि किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के - २० मिलि याचा वापर करावा.ओलिताच्या कपाशीत प्रादुर्भाव जास्तजेथे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे हलके पाणी देऊनच फवारणी करावी. तत्पूर्वी वेचणी महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीची उलंगवाडी करावी.कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनींग मिल्स ठिकाणी कापूस संकलन सुरू झाले आहे. तिथे जिनिंगनंतर चाळणीवरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापूसाची त्वरित विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे.