शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गाविलगडावर नुकसान किती? 42 बैलबंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे.   

अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांसह वन व वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या मेळघाटातील जंगलाला यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वाधिक आगी लागल्या आहेत. यात हजारो हेक्टर जंगल क्षेत्र काळवंडले आहे. कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. जैवविविधता धोक्यात आली आहे. असे असूनही वन व वन्यजीव विभागाच्या रेकॉर्डला केवळ पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद घेतली गेली आहे. ही नोंद  बैलबंडीत मोजली गेली आहे. इंग्रजांपासून ही बैलबंडीची पद्धत असून,  ती आजही वन व वन्यजीव विभागात कायम आहे.मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे.   गाविलगडासह लगतच्या अन्य कम्पार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वन्यजीव विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध दोन वन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आरोपी शोधून काढले जातात की पुन्हा तपासाची कारवाई अंतिम निर्णयाविना होते, याची चर्चा मेळघाटसह अचलपूर तालुक्यात होत आहे. 

शेकडो वनगुन्हे; आरोपी अज्ञात जंगलाला लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वनगुन्हा नोंदविल्या जातो हा वन गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल केला जातो. पण, आगीच्या अनुषंगाने त्या अज्ञात आरोपींचा शोध घेणारी सक्षम यंत्रणा वन व वन्यजीव विभागाकडे अस्तित्वातच नाही. एक-दोन अपवादवगळता आगीच्या मेळघाटातील शेकडो वनगुन्ह्यातील आरोपी आजही बेपत्ता आहेत.

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्षगाविलगड किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. १७ किलोमीटर आवार भिंतीला सतरा ठिकाणी भगदाड पडली आहे. यात किल्ल्यात जायला चोर मार्ग निर्माण झाले आहेत. पण, याकडे पुरातत्व विभाग लक्ष द्यायला तयार नाही. केवळ मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून प्रवेश फी वसूल करण्याचा धंदा तेवढा  पुरातत्व विभाग करीत आहे. 

गाविलगडाचे वाटपगाविलगड किल्ल्याच्या बाहेरील दगडी १७ किलोमीटर लांबीच्या आवार भिंतीसह गाविलगडावरील ऐतिहासिक वास्तू व वस्तूंची देखभाल व दुरुस्ती मालकी हक्काने केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे, तर  आतील वनक्षेत्र हे वन्यजीव विभागाच्या मालकीचे आहे. या जंगल क्षेत्राची निगा राखण्याची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे जाते.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पforestजंगल