रोटाव्हेटर फिरविलेल्या कपाशीचे पंचनामे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:35 IST2017-12-16T22:35:25+5:302017-12-16T22:35:52+5:30
गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.

रोटाव्हेटर फिरविलेल्या कपाशीचे पंचनामे कसे?
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्यात कपाशीचे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. पैकी ५० टक्के क्षेत्रातील कपाशी गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळावी, यासाठी बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव सू. ह. उमराणीकर यांनी ७ डिसेंबरला दिले. याच अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूश सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर व कृषी सहसंचालक यांनी यंत्रणेला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले. अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सर्वेक्षण व बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बाधित १ लाख ४ हेक्टराचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाºयांना सादर केला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र पंचनामे करताना ज्या शेतकऱ्यांनी बाधित कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविला त्या शेतातील कपाशीचे ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसे द्यावेत, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र कोठल्याही स्थितीत शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालकांनी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
- तर ही पद्धत वापरा, जेडीऐंचे निर्देश
प्रमुख पीक असणारी कपाशी यंदा बोंड अळीने बाधित झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला, यासाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ची नैसगीक आपत्तीसाठी मदत मिळू शकणार असल्याने, या मदतीसाठी एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी वास्तवदर्शी पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. ज्या शेतात कपाशीवर नांगर फिरविला. त्या शेतात कपाशीचे अवशेष आहेत. सात-बाºयावर नोंद आहे व लगतच्या शेतकऱ्याला या शेतात कपाशी होती याची माहीती आहे, त्यांचेकडूनही माहीती घ्या. असे निदेश त्यांनी पंचनामा करणाºया यंत्रनेला दिले आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार ४९ टक्के बाधित क्षेत्र
कृषी विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने एक लाख तीन हजार ८०१ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. ही ४९ टक्केवारी आहे. हे क्षेत्र ३३ टक्कयांवर असल्याने नैसगीक आपत्तीची मदत मिळू शकते,जिल्ह्यात प्रति हेक्टरी ८४९ किलोग्रॅम उत्पादन कमी होणार आहे. ही ५१ टक्केवारी असल्याचे कृषी विभागाच्या अहवालाद नमुद आहे. विधीमंडळातही हा प्रश्न विशेषत्वाने चर्च्चिल्या जात आहे. शासनानेही केंद्राकडून मदत मागण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहाला सांगीतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बोंड अळीने कपाशी बाधित झालेले क्षेत्र सुटू नये, वास्तवदर्शी पंचनामे करावेत, जिथे कपाशीवर रोटाव्हेटर फिरविले तिथेही पिकाचे अवशेष, लगतच्या शेतकºयांकडून माहीती, सात-बाºयावरील नोंद घ्यावी,एकही शेतकरी यामध्ये वंचित राहू नये असे निर्देश दिलेत.
- सुभाष नागरे
विभागीय कृषी सहसंचालक