चिखलदऱ्यात घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:14+5:30

बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पंचनामा करून सदर अहवाल तलाठ्यांनी तहसीलदार माया माने यांना पाठविला.

The house collapsed in the mud | चिखलदऱ्यात घर कोसळले

चिखलदऱ्यात घर कोसळले

Next
ठळक मुद्देजिवंत वीज तारा तुटल्या : झाड उन्मळून पडले, नदी-नाले खळखळू लागले

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील एका आदिवासीचे घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. गुरुवारी सकाळी चिखलदरा शहरातील जिवंत वीत तारांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पंचनामा करून सदर अहवाल तलाठ्यांनी तहसीलदार माया माने यांना पाठविला. तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चिखलदरा मंडळ ३५.४ मिमी, सेमडोह ३४.४ मिमी, चुरणी २२.४ मिमी, टेब्रुसोंडा.२४.२४ मिमी, असा सरासरी २९.१५ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात एकूण पाऊस ३४.१५ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे.
चिखलदरा तालुक्यात बुधवारपासून सुरू झालेल्या या मान्यूनपूर्व पावसामुळे परिसरातील सिपना, चंद्रभागा, खुर्शी नद्यांसह नाल्यांना थोड्याफार प्रमाणात पाणी आल्याने मागील दोन महिन्यांपासून मृत पडलेले नदी-नाले खळखळू लागले आहेत.

चिखलदरा, काटकुंभ परिसर अंधारातच
गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्याने चिखलदरा शहरातील मुख्य मार्गावरील विद्युत तारांवर पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर झाड उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटल्या. यात शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यात तीन विद्युत पोल वाकले, तर तालुक्यातील काटकुंभ, चुरणी परिसरातील ४२ गावांमध्ये मागील तीन दिवसांपासून वीपुरवठा खंडित आहे. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी तांत्रिक बिघाड शोधण्यास फिरत असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत परिसराचा विद्युतपुरवठा खंडित होता.

Web Title: The house collapsed in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस