तळेगाव ठाकूर येथे घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST2021-08-29T04:15:07+5:302021-08-29T04:15:07+5:30

लाखोंचे साहित्य जळून खाक, रात्रीच्या अंधारात जीवितहानी टळली तिवसा : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ...

A house caught fire at Talegaon Thakur | तळेगाव ठाकूर येथे घराला आग

तळेगाव ठाकूर येथे घराला आग

लाखोंचे साहित्य जळून खाक, रात्रीच्या अंधारात जीवितहानी टळली

तिवसा : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जीवितहानी मात्र टळली.

विनोद धनराज जाजू यांच्या घराला ही आग लागली. २७ ऑगस्ट रोजी रात्री जाजू कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या राहत्या घराने मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला. पाहता-पाहता आगीने संपूर्ण खोली आपल्या विळख्यात घेतली होती. या आगीत घरातील सोफा, दिवाण, टीव्ही, कपड्यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू जळून खाक झाल्या. नागरिकांनी धाव घेऊन आग विझविली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस पाटील किशोर दिवे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व याबाबत संबंधित विभागाला कळविले.

Web Title: A house caught fire at Talegaon Thakur