एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला आधी स्वतःच्या घरी आणि नंतर रेल्वेने मुंबईला आणून वारंवार बलात्कार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर अमरावतीत खळबळ उडाली.
६ मार्च रोजी रात्री संशयित रितिक (रा. विलासनगर) याच्याविरुद्ध मारहाण, अत्याचार व अपहरणाचा गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १० डिसेंबर २०२५ रोजीनंतर तरुणीवर अनेक बलात्कार केला गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि रितिक यांची एका मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मोबाईलवर संवाद होता, मात्र आरोपीला दारूचे व्यसन असल्याचे समजताच पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
मैत्रिणीसोबत यात्रेला गेली, तिथेच केले अपहरण
तरुणीने बोलणं बंद केल्याचा तरुणाला राग आला. याच रागातून त्याने पीडितेचा छळ सुरू केला. काही दिवसांपूर्वी ती मैत्रिणीसोबत यात्रेला गेली असताना, आरोपीने तिला तिथे गाठले.
दुचाकीवर बसवून विलासनगर येथील घरी नेले. तिथे त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेला रेल्वेमध्ये बसवून त्याने मुंबईला नेले. त्यानंतर त्याने मुंबईत अनेक वेळा बलात्कार केला.
भावालाच ठार मारेन
काही दिवसांनी आरोपी पीडितेला घेऊन अमरावतीत परतला. जेव्हा पीडितेने सुटकेचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला मारहाण केली. माझ्यासोबत राहिली नाहीस, तर तुझ्या भावाला ठार मारेन, अशी धमकीदेखील दिली होती.
Web Summary : A 19-year-old girl was kidnapped, raped at home, then repeatedly in Mumbai. The accused, Ritik, was arrested after the victim reported the crime. He threatened to kill her brother if she resisted.
Web Summary : 19 वर्षीय युवती का अपहरण कर घर में, फिर मुंबई में बार-बार बलात्कार किया गया। आरोपी रितिक को पीड़िता द्वारा अपराध की सूचना देने के बाद गिरफ्तार किया गया। उसने विरोध करने पर उसके भाई को जान से मारने की धमकी दी।