शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजनेची भयावह अवस्था; चिखलदऱ्यात दिवसाआड करावा लागतोय पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:00 IST

Amravati : पाच गावांत टँकरने पाणीपुरवठा, मृत पडतात कोट्यवधींच्या योजना, यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी गावांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात टँकर लावायला सुरुवात झाली आहे, किमान २० पेक्षा अधिक पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई दरवर्षी भासते. त्यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर, पाण्याची पातळी खालावल्याने हातपंपाच्या घशाला कोरड पडली आहे. भ्रष्टाचाराची कीड लागल्याने आदिवासींना शुद्ध पाणी पिण्यासाठी असले, तरी त्या पांढरा हत्ती ठरल्या आहे.

दरवर्षी मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगरदऱ्यात उंच-सखल भागावर असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पावसाळा संपताच नदी-नाले कोरडे पडतात. हातपंप निकामी होतात. पाण्यासाठी आदिवासींना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. फेब्रुवारीपासूनच अनेक गावांमध्ये पेयजलाची भीषण टंचाई जाणवते. कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठ्याची योजना तयार करूनही बदलल्या नाहीत.

एकच युनिट कुठे कधी जाणार?राज्य सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला तालुका असल्याने हातपंप दुरुस्त करणारे एकच युनिट गेल्या अनेक वर्षांपासून आहे. २० वर्षांपासून दुसऱ्या युनिटची मागणी कागदावर आहे.

नंदनवनाचे नशीबच खराबविदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन नावालाच उरले आहे. योजनाचा दुष्काळ येथे सुरू आहे. कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरला आहे. महिन्याभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने पर्यटक कसे येणार, हा व्यवसाय पुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना कशासाठी?मेळघाटात जलजीवन मिशन, घर घर पाणी योजनेला प्रमाणात त्यात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पावसाळ्यात अतिसाराची लागण झाली होती. आमसभेत थेट उपविभागीय अभियंता पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. पाणीटंचाईला हा विभागसुद्धा जबाबदार आहे.

पाच गावांत टँकर, अनेक प्रतीक्षेततालुक्यातील पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे तर अनेक गावे आता प्रतीक्षेत आहे. टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये आकी, खडीमल, मोथा, तारुबांदा, लवादा या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक