शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 17:17 IST

अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला.

अमरावती : एरवी चोरी, घरफोडी केल्यानंतर चोर तातडीने रफुचक्कर होतात. आपण पकडले जाऊ नये, अशी भीती त्यामागे असते. मात्र एक चोर भलताच प्रामाणिक निघाला. त्याने खिडकीत ठेवलेल्या चावीने दाराचे कुलूप उघडून घरातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. २५ जुलै रोजी सकाळी ११.३० ते ५.३० च्या कालावधीत हा प्रकार घडला.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला घराला कुलूप लावून बाहेर पडली. मात्र, आपल्या अनुपस्थितीत कुटुंबातील अन्य सदस्य घरी परतणार असल्याने तिने कुलपाची चावी घराच्या खिडकीत सहजासहजी दिसणार नाही, या पद्धतीने ठेवली.

ती घराबाहेर पडताच सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एक चोर त्या महिलेच्या घरात शिरला. त्याने खिडकीत ठेवलेली चावी शोधली. घरात प्रवेश करून केवळ मोबाईल चोरला. अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले. चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ती महिला सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरी परतली असता, चोरीचा हा अफलातून प्रकार उघड झाला. याप्रकरणी २५ जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरtheftचोरीAmravatiअमरावती