नवीन वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्यांची मेजवानी
By Admin | Updated: October 22, 2015 00:11 IST2015-10-22T00:11:08+5:302015-10-22T00:11:08+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सुट्यांना अधीक महत्त्व असते़ पुढील सन २०१६ चार वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी तर स्वातंत्र्य दिन सोमवारी येणार आहे़

नवीन वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्यांची मेजवानी
मोहन राऊ त अमरावती
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सुट्यांना अधीक महत्त्व असते़ पुढील सन २०१६ चार वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी तर स्वातंत्र्य दिन सोमवारी येणार आहे़ शासनाच्यावतीने या शासकीय सुट्यांची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे़
सन २०१६ या वर्षात शासकीय सुट्यांचे नियोजन करण्यास सुरूवात झाली आहे. पुढील वर्षात प्रजासत्ताक दिन मंगळवार २६ जानेवारी, शिवाजी महाराज जयंती शुक्रवार १९ फेब्रुवारी, महाशिवरात्री सोमवार ७ मार्च, धूलिवंदन गुरूवार २४ मार्च, गुढीपाडवा शुक्रवार ८ एप्रिल, डॉ़बाबासाहेब आंबेडकर जयंती गुरूवार १४ एप्रिल, रामनवमी शुक्रवार १५ एप्रिल, महावीर जयंती मंगळवार १९ एप्रिलला असून या सुट्यांची मेजवानी शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
नवीन वर्षात महाराष्ट्र दिन रविवार १ मे, बुध्द पौर्णिमा शनिवार २१ मे, रमजान ईद बुधवार ६ जुलै, स्वातंत्र्य दिन सोमवार १५ आॅगस्ट, पारसी नववर्ष बुधवार १७ आॅगस्ट, गणेश चतुर्थी सोमवार ५ सप्टेंबर, बकरी ईद सोमवार १२ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती रविवार २ आॅक्टोबर, दसरा मंगळवार ११ आॅक्टोबर, मोहर्रम बुधवार १२ आॅक्टोबर, दीपावली लक्ष्मीपूजन रविवार ३० आॅक्टोबर, दीपावली बलिप्रतिपदा सोमवार ३१ आॅक्टोबर, गुरूनानक जयंती सोमवार १४ नोव्हेंबर, ईद-ए-मिलाद सोमवार १२ डिसेंबर, ख्रिसमस-नाताळ रविवार २५ डिस्ोंबर अशा शासकीय सुट्या राहणार आहेत.