‘शाळासिद्धी’ शासननिर्णयाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:18 IST2017-10-28T23:18:32+5:302017-10-28T23:18:46+5:30

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘शाळासिद्धी’ शाळा मूल्यांकन निर्णय लागू केला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत.....

Holi of the 'school system' | ‘शाळासिद्धी’ शासननिर्णयाची होळी

‘शाळासिद्धी’ शासननिर्णयाची होळी

ठळक मुद्देशिक्षक महासंघ आक्रमक: वरिष्ठ, निवडश्रेणी शिक्षकांसाठी जाचक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘शाळासिद्धी’ शाळा मूल्यांकन निर्णय लागू केला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत शिक्षक महासंघाने शुक्रवारी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करून तीव्र संताप व्यक्त केला. ‘शाळासिद्धी’ शासननिर्णय रद्द होईस्तोवर स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिक्षक महासंघाने संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला आहे.
राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात ‘अ’ श्रेणी प्राप्त माध्यमिक शिक्षकांचा इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात निकाल ८० टक्के असल्यास त्यांनाच वरिष्ठ आणि निवडश्रेणीचा लाभ अनुज्ञेय राहील, असे जाहीर केले आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांचे मूलभूत अधिकार संपविण्याचे कारस्थान असल्याचा प्रहार शेखर भोयर यांनी केला आहे. यापूर्वी शिक्षकांच्या वरिष्ठ, निवडश्रेणीच्या अटी आणि नव्या अटीत मोठी तफावत आहे. शासनाच्या अन्य विभागात कालबद्ध वेतनश्रेणीसाठी कर्मचाºयांना अशाप्रकारे कोणत्याही अटी लादलेल्या नाहीत. तथापि शिक्षकांना अन्यायकारक अटी लागू करून शासनाने समतेच्या तत्त्वाची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेत पायाभूत सुविधांचा अभाव असताना त्याकडे दुर्लक्ष चालविले जात आहे. भौतिक सुविधांचा अभाव, शाळांचा दर्जा व विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण या बाबी शिक्षकांच्या वेतनश्रेणीशी जोडणे हा निर्णय राज्यघटनाविरोधी आहे. शिक्षकांसाठी अन्यायकारक असलेला शासननिर्णय रद्द करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेखर भोयर यांनी दिला आहे. शासननिर्णयाची होळी करताना मनोज कडू, मोहन ढोके, अशोक लहाने, राहुल मोहोड, अनिल पंजाबी, गजानन कराळे, प्रदीप ठाकरे, गजानन देशमुख, दिलीप उगले, अरुण भोयर, विजय ठाकरे, सुधीर केणे, श्याम मानकर, अशोक मोटघरे, अजयसिंह बिसेन, संदीप भटकर, किशोर नवले, अमित बोदडे, संदीप बाजरे, नरेंद्र भटकर, गजानन मानकर, विनोद ढवळे, किशोर निर्मळ, सुरेश मांजरे, प्रवीण कराळे, नीलेश धोंडे, विकास घोगरे, शरद तल्हार आदी उपस्थित होते.

Web Title: Holi of the 'school system'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.