राणा दापत्याकडून होळीचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST2021-03-31T04:14:03+5:302021-03-31T04:14:03+5:30

धारणी : तालुक्यातील हरिसालमध्ये दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी विनोद शिवकुमार व अपर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या ...

Holi insult from Rana Dapatya | राणा दापत्याकडून होळीचा अपमान

राणा दापत्याकडून होळीचा अपमान

धारणी : तालुक्यातील हरिसालमध्ये दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी विनोद शिवकुमार व अपर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ गावातील नागरिक व वनरक्षक वनपाल संघटनेने होळीला या दोघांचे पोस्टर बांधून निषेध केला. त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा, त्यांचे कार्यकर्ते पोहोचले. खासदार राणा यांनीदेखील त्या होळीतील पोस्टरला मेणबत्तीने आग लावली.

त्यांनी त्या होळीवरील पोस्टरला त्यांच्याच पक्षातील एका महिलेला चपलेने मारायला लावले. त्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सर्वांत मोठ्या सण मानल्या जाणाऱ्या पवित्र होळीला चपलेने मारल्याची बाब निंदनीय आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरुद्ध आदिवासींमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, त्यांचा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी संघटनेचे मन्ना दारसिबे, शिवसेनेतर्फे दिनेश धनेवार व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.

Web Title: Holi insult from Rana Dapatya