अनाथ मुलासोबतही त्याचे कुकर्म!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:26+5:302021-03-20T04:13:26+5:30
अमरावती : शयनकक्षात पत्नीसोबत प्रणय रंगविताना शेजारच्या अनाथ अल्पवयीन मुलाला थेट शयनकक्षात उभे करणाऱ्या पतीराजाने तिच्यासोबतदेखील कुकर्म केले. अटकेतील ...

अनाथ मुलासोबतही त्याचे कुकर्म!
अमरावती : शयनकक्षात पत्नीसोबत प्रणय रंगविताना शेजारच्या अनाथ अल्पवयीन मुलाला थेट शयनकक्षात उभे करणाऱ्या पतीराजाने तिच्यासोबतदेखील कुकर्म केले. अटकेतील पतीकडून पोलीस तपासात हा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलाचे १६ मार्च रोजी पोलीस ठाण्यात बयान झाले, तर १७ मार्च रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणामुळे उठलेले वादळ अद्याप शमलेले नाही. पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना ३५ वर्षीय पती हा शेजारच्या १५ वर्षीय मुलाला कक्षात तिच्या नकळत उभा करीत होता. या मुलाच्या संगोपनाची काळजी सदर महिला घेत होती. त्यामुळे त्याच्यादेखत हा प्रकार सहन करण्यापलीकडे होता. यामुळे तिने खोलापुरी पोलीस ठाण्यात १४ मार्च रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर १५ मार्चला पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांना मिळालेला खुलासा धक्कादायक आहे. मुलाचा हा कथित मामा पत्नीशी कामक्रीडा झाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. वर्षभरापासून हे कृत्य होत असल्याचे ‘लोकमत’कडे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणातील ३५ वर्षीय आरोपी आता न्यायालयीन कोठडीत आहेत. खोलापुरीगेट पोलिसांनी प्रथम आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क) सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याचे उघड झाल्यानंतर कुकर्म केल्यामुळे भादंविची कलम ३७७ ही वाढविली आहे.
कोट
सदर आरोपी मुलासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. यासंदर्भाचा गुन्हा नोंदविला होता. मात्र, या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला असता, आरोपी हा त्या मुलाशी कुकर्म करीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी कलम ३७७ वाढविण्यात आली आहे.
महिला पोलीस अधिकारी