हिंगणीकर काँग्रेसमध्ये

By Admin | Updated: February 4, 2017 00:04 IST2017-02-04T00:04:11+5:302017-02-04T00:04:54+5:30

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शुक्रवारी काँग्रेसमध्ये जिल्हाअध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.

Hingni Congress in Congress | हिंगणीकर काँग्रेसमध्ये

हिंगणीकर काँग्रेसमध्ये

शिवसेनेला हादरा : बबलू देशमुख यांचे नेतृत्व
अमरावती : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शुक्रवारी काँग्रेसमध्ये जिल्हाअध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.
दर्यापूर येथील रहिवासी बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह हिंगणीकर यांच्यासह दर्यापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर तराळ, सचिव बाळासाहेब टोळे, पं.स. उपसभापती संजय देशमुख, झेडपीचे माजी सभापती राजेंद्र नागपुरे, शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख सुधीर हुतके आदींसह बहुसंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला दर्यापुरात हादरा बसला आहे. पक्षप्रवेशावेळी काँग्रेसचे नेते बबलू देशमुख, केवलराम काळे, सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, श्याम देशमुख, श्रीराम नेहर, अजित देशमुख, दिवाकर देशमुख आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बबलू देशमुख यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व दुप्पटा टाकून स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Hingni Congress in Congress