शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांच्या हितासाठीच महामार्ग

By admin | Updated: March 5, 2017 00:17 IST

शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे.

वीरेंद्र जगतापांचा आरोप : महामार्ग विरोधी संघर्ष रॅलीत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागधामणगाव रेल्वे/ शिवनी रसुलापूर : शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे. हा महामार्ग तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली.नागपूर येथून निघालेल्या महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या रॅलीचे तालुक्यात आष्टा येथे आगमन झाले यावेळी या रॅलीत शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़विरेंद्र जगताप होते. यावेळी रॅलीत तुकाराम भस्मेसह अनेकांची उपस्थिती होती़ मुंबई येथे समुद्रमार्गाने येणारा भांडवलदारांचा पक्कामाल नागपूरात व येथून मुंबईत पोहचविल्या जाणाऱ्या मालासाठी हा महामार्ग उभारला जात आहे़परदेशी कंपन्याना या महामार्गाचा उपयोग होणार आहे़ एकीकडे शेतमालास भाव नाही, हरभरा, तूर खरेदी केंद्राची अवस्था बिकट आहे़ शेतकऱ्यांचा जीव जात असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शेतकऱ्यांच्या जीवावर उठून हा महामार्ग उभारत आहे़ महामार्ग उभारल्यापेक्षा या रककमेतून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली आहे़ धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील एकही शेतकरी महामार्ग उभारण्यासाठी जमीनीचा तुकडाही देणार नाही. प्रशासनाने अधीक दबाव टाकण्याचे काम केल्यास जशास तसे उत्तर देण्यास सर्व शेतकरी समर्थ आहे व शेतकरी आपल्या पाठीशी असल्याचे आ़जगताप यांनी महामार्ग संघर्षविरोधी रॅलीत बोलताना सांगीतले. (प्रतिनिधी)