आजारी निकिताला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:14+5:302021-07-07T04:15:14+5:30
सेवानिवृत्त कर्मचारी कडून मदत ; परिस्थिती नाजूक फोटो पी ०५ चांदूररेल्वे शारीरिक, आर्थिक स्थिती नाजूक, दानशूर सरसावले चांदूर रेल्वे ...

आजारी निकिताला मदतीचा हात
सेवानिवृत्त कर्मचारी कडून मदत ; परिस्थिती नाजूक
फोटो पी ०५ चांदूररेल्वे
शारीरिक, आर्थिक स्थिती नाजूक, दानशूर सरसावले
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथील आजाराने अंथरुणाला खिळलेल्या निकिताचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तिला अनेक दानशूरांनी आर्थिक आणि अन्नधान्याची मदत केली. पुलगाव येथील सेवानिवृत्त नंदुकाका मेश्राम यांनी १० हजार रुपयांची मदत देऊन संवेदनशील भावनांची जाणीव करून दिली. निकिताला जगण्याचे बळ मिळावे, ही त्यांची अपेक्षा आहे.
निकिता रमेश वानखडे असे या आजारी युवतीचे नाव आहे. राजुरा येथे ती आई-वडिलांसमवेत कुडाच्या एका झोपडीत राहते. काही वर्षांअगोदर तिचे नागपूर येथील एका युवकाशी लग्न झाले. एका मुलीला तिने जन्म दिला. मात्र, त्यानंतर कँसरचे निदान झाले. आधीच शरीराने दुबळी असलेल्या निकिताचे मनही दुबळे झाले आहे. मरणासन्न अवस्थेत आयुष्याच्या अंतिम दिवसांकडे निकिता वाटचाल करीत आहे. तथापि, समाजातील काही जाणिवा जागृत असलेल्या व्यक्तींनी तिला मदत केली. सेवाग्राम दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पण, शस्त्रक्रिया सहन करण्याचीही परिस्थिती व उपचाराचा भार वहन करण्याची कुटुंबाची आर्थिक स्थिती नाही. केवळ द्रव्य पदार्थ सेवन करून ती दिवस काढत आहे. तिला या दिवसात पौष्टीक आहार मिळावा म्हणून पुलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नंदुकाका मेश्राम यांनी निवृत्तीच्या रकमेतून १० हजार रुपयांची मदत निकिताला घरी नेऊन दिली. गतवर्षी आनंदवन येथे जाऊन आजारी रुग्णांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बंडु आठवले आदि उपस्थित होते.
050721\img-20210704-wa0020.jpg
photo