निराधारांना त्वरित मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:25+5:302021-09-22T04:14:25+5:30
युवा सेनेचे तहसीलदारांना साकडे येवदा : दोन महिन्यांपासून परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना ...

निराधारांना त्वरित मदत करा
युवा सेनेचे तहसीलदारांना साकडे
येवदा : दोन महिन्यांपासून परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच सततच्या पावसामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट आहे. यामुळे निराधारांना त्वरित मदत करा, अशी मागणी युवा सेनेने तहसीलदारांकडे केली.
जिल्हाप्रमुख प्रमोद धानोरकर, महानगरप्रमुख पराग गुडदे, युवा सेना तालुकाप्रमुख अभिजित मावळे यांच्या नेतृत्वात दर्यापूर येथील नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर यांना निवेदन देण्यात आले. माजी तालुका उपप्रमुख नंदकुमार निकोले, सागर नागोसे, कुलदीप ढेपे, उमेश माहुलकर, अनिल राक्षसकर, नारायण ठाकूर, अमोल निचळ, नितीन माहुरे, जगदीश उंबरकर, उमेश पंडित, अजय स्वर्गे, सूरज गणोरकर, पंकज नांदूरकर हे उपस्थित होते.