शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अकोलीत हिंसक गाईचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 00:19 IST

अकोली रोड व म्हाडा परिसरात हैदोस घालणाऱ्या हिंसक गाईवर महापालिकेच्या पथकाने तब्बल पाच तासांनंतर नियंत्रण मिळविले.

पाच तासांनंतर नियंत्रण : नागरिकांचा जीव भांड्यातअमरावती : अकोली रोड व म्हाडा परिसरात हैदोस घालणाऱ्या हिंसक गाईवर महापालिकेच्या पथकाने तब्बल पाच तासांनंतर नियंत्रण मिळविले.या गायीला बेशुद्ध करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. १९ मे रोजी पशुवैद्यकीय विभागास धामोरीकर यांनी याबाबत महापालिकेला कळविले होते. म्हाडा कॉलनी व अकोली परिसरात एक गाय हिंसक झाल्याने जीवित हानी होऊ शकते, अशा माहितीची गांर्भीयाने दखल घेऊन पशुवैद्यकीय विभागातील पथक निरीक्षक सागर गवई व मजूर घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनीही या गाय पकडण्याचा प्रयत्न केला. गाईने सात व्यक्ती व लहान मुलांसह कर्मचारी यांना जखमी केले होते. शर्तीने प्रयत्न करून ही गाय नियंत्रणात येत नसल्याने आयुक्त तिला पकडण्याची परवानगी घेऊन सदर गाईला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाची मदत घेण्यात आली. अमोल गावनेर व वानखडे यांच्यासह वनविभागाची रेस्क्यू टीम व सचिन बोंद्रे पशुवैधक यांनी घटनास्थळी सापळा रचून टेंग्यूलाईजर गनच्या सहाय्याने मारक्या गाईवर नियंत्रण मिळविले. ही गाय रेबीजग्रस्त असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. कारवाईमध्ये निखिल तिवारी, बजरंग लोखंडे, रमेश बाप्पू, तोकीर भाई यांना जखमी व्हावे लागले, कार्यवाहीदरम्यान वनविभागाचे कर्मचारी वानखडे, सचिन बोंद्रे व निरीक्षक सागर गवई व वानखडे, फिरोज खान, अनिल शिंदे,, चंदु ढवळे, जफर, विठ्ठल वानखडे, रुपेश वानखडे, प्रफुल्ल लोखंडे यांनी मोलाचे प्रयत्न केले. ही कारवाई केल्यानंतर येथील शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी महापालिकेसह वनविभागाच्या पथकाचे आभार मानले आहेत. या मोकाट गाईमुळे येथील नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. याशिवाय महिला तरुणींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून तूर्तास त्यांची मुक्तता झाली आहे. (प्रतिनिधी)