शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदायिनीच आजारांच्या विळख्यात

By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST

गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची

मोहन राऊत - अमरावतीगावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ३३६ उपकेंद्र आहेत. या केंद्रात रूग्णांची सेवा जिल्ह्यातील ४०२ आरोग्य सेविका बजावतात. सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्याने या आरोग्य सेविका अधिक सतर्क झाल्या आहेत़ त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा आढावा घेतला असता त्यांना वाढत्या धावपळीत स्वत:चे आरोग्य सांभाळणे कठीण झाले आहे़ नव्याने असांसर्गिक रूग्णांची जबाबदारी देखील आरोग्य सेविकांवर सोपविण्यात आली आहे. रक्तदाब, कर्करोग ह्दयरोग, मधुमेह असे आजार असल्यास रूग्णांना औषोधपचार करण्यासाठी शहराच्या दवाखान्यात नेण्याचे काम त्यांना करावे लागते. ही कामे करताना त्यांना गावपुढाऱ्यांचा त्रास सोसावा लागतो, तो वेगळाच. उपकेंद्र बंद दिसले की थेट आरोग्य सेविकांची तक्रार तालुका पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर करण्यात येते़ परंतु या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला जात नाही आणि थेट निलंबनाची कारवाई केली जाते. हा प्रकार अन्यायकारक असल्याचा सूर आरोग्य सेविकांमधून उमटत आहे. वर्षाकाठी २ ते ३ हजार कागदपत्रे आरोग्य योजनेची कागदपत्रे तयार करणे, झेरॉक्स काढणे, औषधांची खरेदी करणे, इलेक्ट्रीक बिल भरणे, पाणीपट्टी भरणे ही कामे अल्प निधीमध्ये आरोग्य सेविकांना करावी लागतात. याकामी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असा सूर आरोग्य सेविकांमधून उमटू लागला आहे. एकीकडे ग्रामपातळीवर आरोग्य सेविकांना असामाजीक घटक त्रास देतात तर दुसरीकडे प्रशासनही सहकार्य करीत नसल्याची त्यांची ओरड आहे.