आरोग्य विभाग २४ तास सेवेत; डीएचओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:53+5:30

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या कुठल्याही रजा मंजूर करू नये, प्रत्येक आरोग्य संस्थेत आंतरबाह्य स्वच्छता ठेवावी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास आरोग्य सेवा कार्यरत ठेवावी, साथरोग पथक नियमित कार्यरत ठेवावे, इन्फ्ल्युएंझा व श्वसनसंस्थेतील तीव्र प्रादुर्भावाच्या आजाराचे सर्वेक्षण करावे, ......

Health Department 24 hours service; Order of DHOs | आरोग्य विभाग २४ तास सेवेत; डीएचओंचे आदेश

आरोग्य विभाग २४ तास सेवेत; डीएचओंचे आदेश



अमरावती : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी ग्रामीण भागातील ५९ प्राथमिक आरोग्य केंदे्र ही ‘२४ बाय ७’ सेवेत ठेवण्याचे आदेश १४ मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या कुठल्याही रजा मंजूर करू नये, प्रत्येक आरोग्य संस्थेत आंतरबाह्य स्वच्छता ठेवावी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास आरोग्य सेवा कार्यरत ठेवावी, साथरोग पथक नियमित कार्यरत ठेवावे, इन्फ्ल्युएंझा व श्वसनसंस्थेतील तीव्र प्रादुर्भावाच्या आजाराचे सर्वेक्षण करावे, रुग्णालयात येणाºया रुग्णास खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास रुग्णास ते गत २८ दिवसांत परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीपैकी कुणाच्या संपर्कात आले होते काय याबाबत चौकशी करावी व संबंधित रुग्णास उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्यामार्फत या आजाराचे सर्वेक्षण करावे व खबरदारीच्या उपायांची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना डॉ. रणमले यांनी दिल्या.

कोरोना विषाणूबाबत खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना लेखी सूचना दिल्या आहेत. यात कुठलीही कुचराई व्हायला नको, अन्यथा दोषीवर कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ.दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी
 

Web Title: Health Department 24 hours service; Order of DHOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य