आरोग्यासाठी सायकल :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:53 IST2018-02-25T22:53:47+5:302018-02-25T22:53:47+5:30

आरोग्यासाठी सायकल :
नाशिक शहर पोलीस व हवाई दल यांच्याद्वारे ‘सुरक्षित वाहतूक व आरोग्यासाठी सायकल’ या मोहिमेचा २२ फेब्रुवारी रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयातून शुभारंभ झाला. धुळे, भुसावळ, अकोला मार्गे ही रॅली रविवारी अमरावतीत प्रवेशली. त्या सायकल रॅलीला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी झेंडी दाखवून नागपूरकडे रवाना केले. यवतमाळ, वाशिम, जालना, शिर्डी, नाशिक असा एकूण १६०० किमीचा प्रवास पूर्ण करून ४ मार्च रोजी नाशिक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत नाशिक पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी व एअरक्राफ्ट अधिकारी सहभागी झालेत.