आॅनलाईन सातबारा ठरला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
By Admin | Updated: March 13, 2016 00:15 IST2016-03-13T00:15:45+5:302016-03-13T00:15:45+5:30
आॅनलाईन सातबाराच्या नोंदी सुरु होऊन आठ महिने झाले. परंतु आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

आॅनलाईन सातबारा ठरला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
तिवसा : आॅनलाईन सातबाराच्या नोंदी सुरु होऊन आठ महिने झाले. परंतु आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नोंदविलेल्या समस्यांवर उपाय न सापडणे, इंटरनेट रेंज न मिळणे, इंटरनेटच्या पूर्वीचे अपुरे रेकॉर्ड, मोठ्या गावांना एकच तलाठी असल्याने कामाच्या नोंदी सुरळीतपणे सुरु होणे येत्या काही महिन्यात तरी शक्य नसल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीतून समोर आले आहे.
तिवसा तालुक्यात १ आॅगस्ट महसुलदिनी सातबारा नोंदी, वाटप, फेरफार ही कामे पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे फर्माण निघाले. परंतु त्यासाठी पूर्ण तयारी नसतांना हे काम सुरु झाल्याने तलाठी कार्यालये व तलाठी प्रचंड त्रस्त झाले आहे. ज्यांच्या सोईसाठी हे सुरु झाले त्यांनाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. सातबाऱ्याच्या शुल्कातून त्यांना शासनाने पुरविलेला नाही. (प्रतिनिधी)
प्रत्येक तलाठ्याजवळ लॅपटॉप आहे. त्यांना डोंगल दिले असून याचे बिलदेखील शासन प्रदान करते. कनेक्टीव्हीटीची अडचण आहे. शेतकऱ्यांना सातबारा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- राम लंके,
तहसीलदार, तिवसा