...अन् प्रेयसीसमक्षच ‘त्याने’ गळफास लावून घेतला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 22:25 IST2022-04-06T22:23:53+5:302022-04-06T22:25:11+5:30

Amravati News प्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने, अगदी तिच्यासमोर प्रियकर फासावर झुलला.

... He strangled himself in front of his girlfriend! | ...अन् प्रेयसीसमक्षच ‘त्याने’ गळफास लावून घेतला!

...अन् प्रेयसीसमक्षच ‘त्याने’ गळफास लावून घेतला!

ठळक मुद्देपळून जाऊन लग्न करण्याच्या हेक्याने प्रेमकहाणीचा अकाली अंत प्रेयसीविरुद्ध गुन्हा

 

अमरावती : प्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने, अगदी तिच्यासमोर प्रियकर फासावर झुलला. तिला काही क्षणासाठी ती गंमतच वाटली. मात्र, ती गंमत नव्हे, त्याने खरोखरच गळफास घेतला, हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. त्या हेक्यापोटी तो जीव गमावून बसला. तो जीवाने गेला अन् दुसरीकडे तिच्याविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

            दस्तुरनगर भागात ५ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. जयेश श्यामकुमार दादलानी (२५, दस्तुरनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची व ५ एप्रिल रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास संबंधित तरुणीविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. केवळ प्रेयसीच्या हेकेखोर वृत्तीमुळे त्या प्रेमकहाणीचा अकाली अंत झाला. नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या जयेशचे शंकरनगर परिसरातील २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. ते लग्नदेखील करणार होते. त्यांच्या लग्नाला जयेशच्या कुटुंबाचा विरोध नव्हता. मात्र, मुलीचे पालक टाळाटाळ करीत होते. त्यानंतरही घरच्यांच्या विरोधात जाऊन ती जयेशला पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह धरत होती. तसे न केल्यास जयेशला व त्याच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होती. पळून जाऊन विवाह न केल्यास आपण आपल्या जीवाचे बरे-वाईट करू, अशी धमकी ती जयेश व त्याच्या कुटुंबीयांना देत होती.

निर्णय घ्या, अन्यथा जयेशचा शेवटचा दिवस

तक्रारीनुसार, आरोपी तरुणीने जयेशच्या नातेवाईकाला ५ एप्रिल रोजी कॉल केला. आज निर्णय न झाल्यास जयेशच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, अशी धमकी तिने दिली. त्याबाबतही जयेशच्या वडिलांनी तक्रारीतून उहापोह केला आाहे.

 

Web Title: ... He strangled himself in front of his girlfriend!

टॅग्स :Deathमृत्यू