तो म्हणाला, थांब तुझा बलात्कार करतो! नागरिक मदतीला धावल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 19:21 IST2021-11-10T19:20:37+5:302021-11-10T19:21:06+5:30
Amravati News घरासमोर दिवा लावत असलेल्या एका महिलेसमोर अचानक येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तथा तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. मोहल्यातील नागरिक तिच्या मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळला.

तो म्हणाला, थांब तुझा बलात्कार करतो! नागरिक मदतीला धावल्याने अनर्थ टळला
अमरावती : घरासमोर दिवा लावत असलेल्या एका महिलेसमोर अचानक येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तथा तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. मोहल्यातील नागरिक तिच्या मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळला. पार्वतीनगर नंबर २ येथे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी संशयित प्रवीण किसनराव राजुरकर (४५, रा. पार्वतीनगर नं.२) याच्याविरुद्ध कलम ३५४ अ, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, प्रवीण राजुरकरची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तो नेहमीच मोहल्यातील महिलांची छेड काढत असतो. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी एक महिला घराबाहेर दिवा लावत होती. त्यावेळी तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. ती जोरात ओरडली. त्यावेळी बघ्यांपैकी एक तरुण तिच्या मदतीला धावला. तिला त्याच्या तावडीतून सोडविताना त्या तरुणाच्या मानेवर जखमदेखील झाली. तेव्हा मोहल्यातील अन्य नागरिक जमा झाले. ते धावल्याने प्रवीण राजुरकरने तेथून पळ काढला. रात्री ११.२३ च्या सुमारास याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पांडे हे पुढील तपास करीत आहेत.